- पिंपरी-चिंचवडमध्ये १७ जानेवारीला राज्यातील सर्वात मोठी सायकल रॅली
पिंपरी । प्रतिनिधी
इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यावर्षी होणारी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्धयांना समर्पित करण्यात आली आहे, अशी घोषणा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने रविवार, दि. १७ जानेवारी २०२१ रोजी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्वात मोठी सायकल रॅली पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या रॅलीमध्ये सुमारे ५ हजार सायकलस्वार सहभागी होत असतात. यावर्षी कोरोना आणि लॉकडाउनमुळे रॅलीचे नियोजन पुढे ढकलण्यात आले होते.
दरम्यान, प्रशासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करीत येत्या १७ जानेवारीला भोसरीतील गावजत्रा मैदानावर (कै. अंकुशराव लांडगे सभागृह शेजारी) सकाळी ६ वाजता रॅलीला सुरूवात होईल. १० किमी आणि २५ किमी अशा दोन टप्पयांमध्ये ही रॅली होणार आहे.
*
सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी… PCMCSmartSarathi अॅपमध्ये नोंदणी करा.
●Play store - https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
●App Store - https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS
किंवा पुढील लिंक वर क्लिक करून नोंदणी करता येईल. http://bit.ly/RIVERCYCLOTHON
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. संजय पटनी, प्रसिद्घीप्रमुख, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
मोबाईल क्रमांक : +91 98222 17163

COMMENTS