=* केज प्रतिनिधी: दि. ५ जाने- भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी तसेच अंधकारमय जीवनातून...
=* केज प्रतिनिधी: दि. ५ जाने- भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी तसेच अंधकारमय जीवनातून समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. नंदिनीताई ठोंबरे तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. योगिनीताई थोरात या उपस्थित होत्या. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला याचे औचित्य साधून केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे आयोजन करण्यात आले तेंव्हा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिकांचा याप्रसंगी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षी हा पुरस्कार श्रीमती. सुमन चाटे (गदळे)- मू.अ. राजर्षी शाहू विद्या मंदिर केज, श्रीमती राजश्री शिंदे (गायकवाड) स. शि.- स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्रा. वि.) केज, श्रीमती सुरेखा पिसे (राऊत)- स. शि.- जि.प. मा. शाळा मस्साजोग, श्रीमती. राजश्री कांबळे (टिके) स. शि.- डॉ. वि. दा. कराड मा. वि. केज यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्रीमत. देशपांडे मॅडम यांनी दिला. प्रारंभीस शाळेतील कु. अमृता सोनवणे व प्राजक्ता जाधव या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले विचार मांडताना उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या पुढील सत्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जसा स्त्रीचा हात असतो तसेच यशस्वी स्त्रीच्याही पाठीमागे कोणत्या ना कोणत्यारुपी पुरुषाचा हात असतो. हे सांगून आपापल्या जीवनातील विविध अनुभव याप्रसंगी कथित केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. योगिनीताई थोरात यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या यशाच्या पाठीमागे खरोखरच शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो कारण तेच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रवाहात जगण्याची दिशा दाखवतात तेव्हा निश्चितच आशा कर्तुत्ववान, क्रियाशील व सजग शिक्षकांचे सत्कार झाले पाहिजेत. सावित्रीबाईंनी समाजाचा रोष पत्करून मुलींना शिक्षण दिले त्याचेच फलित गुणवत्तेच्या बाबतीत मुलांपेक्षा मुलीच पुढे आहेत तेव्हा मुलांनीही अथक परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध केले पाहिजे. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक हसतमुखद मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयक मार्गदर्शन वर्ग भरवण्याचेही सुचवले. अध्यक्षीय समारोपात डॉक्टर नंदिनीताई ठोंबरे म्हणाल्या, आज भारतीय स्त्री ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरेची जोपासना करते तेव्हा आज भारतीय स्त्रीचे कार्य जगामध्ये अद्वितीय आहे आज मुली प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना दिसत आहेत तेव्हा स्त्रीकडे कलुषित दृष्टीने पाहण्याची समाजाची मानसिक विकृती बदलणे गरजेचे आहे. कारण स्त्री गुलाम झाली तर संपूर्ण राष्ट्र गुलाम होते शेवटी त्यांनी काही प्रसंग विनोदी शैलीत कथित करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, सचिव प्रकाश दादा कोकीळ, सहसचिव जी.बी. गदळे सर, गणेश कोकीळ, शाळेचे मु.अ. बी.व्ही. गोपाळघरे, मु.अ. वसंतराव शितोळे, प्रा. शंकर भैरट, तसेच पालक व शिक्षकवृंद आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. मुळे मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती. डांगे मॅडम यांनी मानले.

COMMENTS