धर्माबाद(अहमद लड्डा):-भोकर तालुका दिवशी बु.येथील ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन खुन केल्याच्या निषेधार्थ विविध संघटनेच्या वतीने धर्माबाद शहरातील पानसरे चौकात शोकसभा घेऊन अभिवादन करण्यात आले.आरोपीला तत्काल फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली.
दिवशी बु.येथिल सालगडी म्हणुन काम करीत असलेला नराधम बांबु उकंड सांगेराव यांनी मालकाच्या ५ वर्षीय मुलीवर २० जानेवारी रोजी अत्याचार करुन तिचा निर्घन खुप करून मृतदेह सुधा नदीच्या बाजूस टाकून दिला त्यामुळे गावासह जिल्ह्यात संतापाची लाट पसरली.विविध संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत शोकसभा घेण्यात आली. व चिमुकली ला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मा.सभापती सखाराम निलावार, पंचायत समिती सभापती मारोती कागेरू, शिवसेना मा.तालुका प्रमुख गणेश गिरी, नगरसेवक संजय पवार,पत्रकार भगवान कांबळे, महेश जोशी,शेख रज्जाक,धडेकर गंगाधर,अनिल कमलाकर,साई पेकमवार, मारोती माकणे,प्रभाकर बामणे, शेख मोईन, सय्यद इमरान पटेल,राजु शिरामणे, नवाज भाई फुलवाले, एम के पाटील, संतोष येरावार, शेख शाकेर मोखांडीकर, लखण सौडलू, वडजे व धर्माबाद अनेक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS