माजलगाव प्रतिनिधी
१८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या १८४ व्या जयंती निमित्त माजलगाव शहर पोलीस ठाण्याला 38 वेगवेगळ्या वृक्षांसह फुलांच्या झाडांची भेट देण्यात आली. हा अनोखा वृक्षप्रेमी उपक्रम तुळजाभवानी अर्बन च्या वतीने राबविण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांची 184 जयंती तुळजाभवानी अर्बन अनोख्या पद्धतीने साजरी केली.कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.त्यानंतर शहरातील पोलिस ठाण्याला 38 वेगवेगळ्या वृक्षांसह फुलांच्या झाडाची भेट देण्यात आली.तुळजाभवानी अर्बनच्या या अभिनव उपक्रमाचे यावेळी पोलिस दला कडून कौतुक करण्यात आले. दरम्यान यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे सपोनि अविनाश राठोड यांनी बँकेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. यावेळी बँकेचे कर्मचारी अशोक मगर, नवनाथ शिंगने, कृष्णा मोरे उपस्थित होते.

COMMENTS