उदगीर।प्रतिनिधी : 'डॉक्टरला आपण देव मानतो ' हे आपण ऐकून होतो.पण त्याचा प्रत्यय नुकताच आला आहे .उदगीर येथील नामांकीत दिपज्योती नेत्र रुग्णालयाच्या सुप्रसिध्द नेत्रतज्ञा डॉ. ज्योती दीपक सोमवंशी यांनी उदगीर येथील एका खाजगी रुग्णालयात एका आठ महिन्याच्या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या बाळाची नेत्र शस्त्रक्रिया करून त्याला दृष्टी देण्याचे काम केले. डॉ. ज्योती सोमवंशी हया गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या अशा नेत्र शस्त्रक्रिया केल्या .परंतु कमी वयाची ही एकमेव शस्त्रक्रिया आहे. हे आठ महिन्याचे बाळ प्रांजली प्रभाकर घोलबंड रा.बोरगाव ता.जळकोट जि. लातूर येथील असून ते बाळ जग बघू शकणार नाही म्हणून त्याचे कुटुंबीय चिंतेत होते . पण शस्त्रक्रियेनंतर हे बाळ टक टक पाहू लागले अन त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टरात देव दिसू लागला.सर्व कुटुंब आनंदी झाले .डॉ. ज्योती दिपक सोमवंशी यांनी आतापर्यंत ५० हजार पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. दिपज्योती नेत्रालयाच्या माध्यमातून दृष्टी देण्याचे त्या अविरत कार्य करीत आहेत.नेत्र शस्त्रक्रियेतील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अति महत्वाचा समजला जाणारा चेन्नईचा ' दृष्टिदूत ' हा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. आपले बाळ आता जग पाहू शकते या आनंदात त्या बाळाच्या कुटुंबीयांनी डॉ. ज्योती सोमवंशी याना धन्यवाद दिले तर या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...


COMMENTS