मुंबई –(. ) येथे सुरू असलेल्या ८२व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या सबज-ज्युनियर गटात पुण्याच्या नील मुळे याने विजेतपद मिळविले. कमालीच्या आत्मविश्वासाने भारलेल्या खेळाचे प्रदर्शन करत त्याने ही कामगिरी केली.
अंतिम फेरीच्या लढतीपर्यंत मजल मारताना नीलने आपल्या खेळाने उपस्थितांना प्रभावित केले. त्याच्या खेळात सुरवातीपासून कमालीची लवचिकता आणि जिंकण्याचा ध्यास दिसून येत होता. अंतिम सामन्यात तर त्याने याचा प्रदर्शन करताना कमालीच्या संयमाने नांदेडचा प्रतिस्पर्धी अमिष आठवले याच्यावर ४-३ अशी मात केली. नीलने लढत ८-११, ११-५, ९-११, ११-४, १०-१२, ११-२, ११-९ अशी जिंकली.
त्यापूर्वी, उपांत्य फेरीच्या लढतीतही त्याने मुंबईच्या कुशल पटेलचे आव्हान अशाच एका चुरशीच्या लढतीत पहिले तीन गमाविल्यानंतरही परतवून लावले. नीलने ही सढत २-११,४-११, ११-१३, ११-६, ११-९, १३-११, ११-५ अशी जिंकली. दुसऱ्या उपांत्य लढतीतही अमिषलाही सात गेमपर्यंत लढावे लागले होते. त्याने नाशिकच्या कुशल चोपडा ३-११, ११-९, ११-८, ११-८, ६-११, ३-११, ११-६ असा पराभव केला.
कुशलने नंतर मंबईच्या कुशल पटेल याचा ५-११, १२-१०, ११-४, १२-१० असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
सब ज्युनियर गटाचा निकाल :
उपांत्यपूर्व फेरी :
कुशल पटेल वि. वि. उदित सचदेव 11-7, 7-11, 11-2, 11-8, नील मुळे वि. वि. गौरव पंचांगम 13-11, 11-9, 11-4, अमिश आठवले वि. वि.स्वस्तिक अटणीकर 4-11,11-8, 11-8, 3-11, 11-9, कुशल चोपडा वि. वि. संस्कार बासक 11-7, 11-6, 14-12
उपांत्यफेरी :
नील मुळे वि. वि. कुशल पटेल 2-11, 4-11, 11-13, 11-6, 11-9, 13-11, 11-5 , अमिश आठवले वि. वि. कुशल चोपडा 3-11,11-9, 11-8, 11-8, 6-11, 3-11, 11-6
अंतिम फेरी :
नील मुळे वि. वि. अमिश आठवले 8-11,11-5, 9-11, 11-4, 10-12, 11-2, 11-9
तिसरे- चौथे स्थान :
कुशल चोपडा वि. वि. कुशल पटेल 5-11, 12-10, 11-4, 12-10

COMMENTS