केज, (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील डोंगर भागातुन आपले शिक्षण पुर्ण करून स्वत:एक शिक्षक होवून शिक्षणाचे धडे देणारे व ग्रामीण भागातील जिवाचीवाडी येथील रहिवाशी व विठ्ठल शिक्षण प्रासारक मंडळ सारणी ( सां) शाळेतील शिक्षक , सारंग बळीराम काळे यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यात त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या एका छोट्याशा जिवाचीवाडी या वाडीत जन्म घेतलेल्या सारंग बळीराम काळे यांनी आपले जिद्दीने आपले शिक्षण पुर्ण करून देशाचे भविष्य घडवण्याच्या ऊद्देशाने शिक्षकी पेशा स्विकारला.सध्या ते केज तालुक्यातील विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज रोजी त्यांचे वय ५१ वर्ष असुन ते दि. २४ रोजी रविवारी दुपारी ०२:००वा. दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदी वरील पुला वरून जात असताना त्यांची जिप पलटी झाल्याने यात ते गंभीर जखमी झाले होते. ऊपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. त्यांच्या पाश्चात पत्नी , एक मुलगा एक , मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या दुर्घटनेतील निधनाने त्यांच्या काळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असुन त्यांचे मित्र,आपतेष्ट, सहकारी यांनी सोशल मिडियावरून आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. दै.लोकनायकचे केज तालुका प्रतिनिधी महादेव काळे यांचे ते चुलत बंधु होते.त्यांच्या दुखा:त दै.लोकनायक परिवार सहभागी आहे.

COMMENTS