राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर शहरातील सह्यांद्रि रिसोर्ट जवळ श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन सोमवार दि.4 जाने.स.11वा.माहूरचे योगी प.पु.शामबापु भारती महाराज यांचे हस्ते विधीवत संपन्न झाले.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या कामात प्रत्येक राम भक्ताचा वाटा असावा असा सदहेतू डोळ्या समोर ठेवून संघ,विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटनेच्या पुढाकाराने दि.15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या एक महीन्याच्या कालावधीत माहूर तालुक्यात निधी संकलन केले जाणार आहे.त्या करीता माहूर येथे उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शाम बापु यांचे हस्ते श्री रामाच्या प्रतिमेचे पुजन व आरती करून करण्यात आले. या विधीचे पौरोहीत्य वेद पाठ शाळेचे गुरुजी वे.शा.सं.निलेश केदार यांनी केले. यावेळी केलेल्या मार्गदर्शनातून केदार गुरुजी यांनी कौरवांवर स्वारी करण्यासाठी अनेक राजे पांडवाना मदत मागण्यासाठी आले असता युधिष्ठीराने आम्ही पाच नव्हे तर एकशे पाच असल्याचे उत्तर दिल्याचा महाभारतातील दाखला देवून कुठलाही भेदभाव व अहंकार प्रभू रामचंद्राच्या पायी ठेवून निधी संकलन करण्यालाच अधिक प्राधान्य द्यावे अशी विनंती केली.ज्यावेळी प्रभू राम वनवासाला गेलेत त्यावेळी भरताने ज्याप्रमाणे राजपाठ त्यागला तो आदर्श डोळ्या समोर ठेवून राम भक्तांनी निधी संकलन अभियान यज्ञात सहभाग घ्यावा असे शामबापुनी आवाहन केले.या सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्र संचलन विजय आमले यांनी केले.या मंगल प्रसंगी संघचालक अनिल काण्णव,विश्व हिंदू परिषदेचे चंद्रकांत रीठे, तालुका कार्यवाहक हिमालय राऊत,सहकार्य वाहक राजेंद्र जयस्वाल,उपखंड प्रमुख वैभव पांडे,भोलेश्वर सुरोशे,जिल्हा अभियान प्रमुख संतोष रायवार,सतीश काण्णव, कामगार संघाचे संजय सुरोशे,बजरंग दलाचे किशोर राठोड,भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर, युवा नेते सुमित राठोड,शहराध्यक्ष गोपु महामुने,महीला शहराध्यक्ष अर्चना दराडे,रंजना दीक्षित, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव,समरभाऊ त्रिपाठी,अनिल वाघमारे,अच्यूत जोशी,निळकंठ मस्के, संजय पेंदोर,प्रमोद सोनकर,राजू दराडे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.पूज्य संतोका आव्हान,मिलकर करो भव्य मंदिर निर्माण च्या जय घोषात या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

COMMENTS