माजलगाव (प्रतिनिधी)
नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीवर औरंगाबाद विभाग (मराठवाडा) संयोजकपदी माजलगाव येथील डॉ.प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली.
यापूर्वी त्यांच्याकडे प्रदेश सहसंयोजक ही जवाबदारी होती. त्यांनी सातत्याने केलेल्या कामामुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा.मंत्री पंकजाताई मुंडे, भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक भाजपा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.प्रितमताई मुंडे भाजपा सहकार आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.मंत्री सुभाष बापू देशमुख व सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक प्रा.संजय भेंडे यांनी त्यांची भाजपा सहकार आघाडीच्या प्रदेश कार्यकरिणीवर मराठवाडा संयोजक म्हणून नियुक्ती केली.
या निवडी नंतर त्यांचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, माजलगाव मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे नेते रमेशराव आडसकर, रा.स्व. संघ विभाग कार्यवाह अनंत गुजर भाजपा माजलगाव तालुका अध्यक्ष अरुण राऊत, प्रभाकर साळेगावकर, वडवणी पंचायत समितीचे सभापती बळीराम आजबे, डॉ.शंकर जुजगर, हनुमान कदम, अमरनाजी खुर्पे, गोविंद बजाज, शशिकीरण गडम, डॉ.स्वानंद कुलकर्णी, ओंकार खुर्पे, प्रशांत भानप, नगरसेवक गटनेते विनायक रत्नपारखी, भाजपा बीड जिल्हा सोशल मीडिया संयोजक दत्ता महाजन दिलीपराव पारेकर कमलाकर कुरे, प्रवीण शेजुळ, पवन मोगरेकर, निरंजन वाघमारे, कैलास जोशी यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय, कृषी आशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS