पिंपरी (दि. 25 जानेवारी 2021) ‘भिमाकोरेगाव’ दंगली प्रकरणातील संशयीत आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 28 जानेवारी) पिंपरी ते मंत्रालय मुंबई निघणा-या दुचाकी रॅलीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व महिला आघाडीने सहभागी होऊन लढा यशस्वी करावा असे आवाहन आरपीआय (अ) पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सिमाताई रामदास आठवले यांनी केले.
भिमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समितीच्या समन्वयक सुवर्णा राहुल डंबाळे, मेघा आठवले, अंजना गायकवाड यांच्यासह महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सिमा आठवले यांना पुणे येथे भेटून पत्र दिले.
यावेळी सिमा आठवले म्हणाल्या की, तीन वर्षापुर्वी भिमाकोरेगावला दंगल झाली होती. या दंगलीतील प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी इतर पंधराशे आरोपींना अद्यापही अटक झाली नाही त्यामुळे देशभरातील आंबेडकरी जनतेत तीव्र असंतोष वाढत आहे. सरकार या प्रकरणी न्याय कधी देणार असा प्रश्न घेऊन भिमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी गुरुवारी (दि. 28 जानेवारी 2021) पिंपरी ते मंत्रालय, मुंबई दुचाकी रॅली काढणार आहेत. या रॅलीला आरपीआयच्या वाहतूक आघाडीने पाठिंबा दिला असून आरपीआयच्या व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिका-यांनी सहभागी व्हावे. या रॅलीचे संघटन पाहून सरकार देखील योग्य ते पाऊल उचलेल अशी आशा सिमा आठवले यांनी व्यक्त केली.
रॅलीच्या समन्वयक सुवर्णा डंबाळे म्हणाल्या की, भिमा कोरेगाव हल्ल्यामधील आरोपींवर शिक्षेची कारवाई कधी होणार ? हा रास्त प्रश्न घेऊन हि रॅली होणार आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी आंबेडकरी चळवळीतील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करीत पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई परिसरातील वस्तांमध्ये चाळीस बैठका घेण्यात आल्या आहेत. अद्यापही बैठका सुरु असून या रॅलीत सहभाग घेण्यासाठी चार हजारांहून जास्त दुचाकीस्वारांनी उर्स्फुतपणे नोंदणी केली आहे. अद्यापही ज्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी 7304600600 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 9822917119 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गुरुवारी 28 जानेवारी पिंपरी ते मंत्रालय निघणा-या दुचाकी रॅलीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सरकारने कोरोना विषयक सांगितलेल्या नियमांचे पालन करुन सहभागी व्हावे असे आवाहन सुवर्णा डंबाळे यांनी केले.
-------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : सुवर्णा डंबाळे -- 9822917119.

COMMENTS