*खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पि एस आय शिंदे वर कारवाईचे एस पीं ना निवेदन*


दिंद्रुड (प्रतिनिधी):-

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पीएसआय विठ्ठल शिंदे यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन येथील माजी सरपंच दिलीप कोमटवार यांच्या मुलावर केलेली खोटी केस तात्काळ मागे घेत पीएसआय विठ्ठल शिंदे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणेबाबत दिंद्रुड ग्रामस्थांनी बीड पोलिस अधीक्षकांना काल दि ६ रोजी निवेदन दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अखिल भारतीय समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या हस्ते हे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. 

      गेल्या काही दिवसांपूर्वी दिंद्रुड गावचे सरपंच व सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पॅनल प्रमुख दिलीप कोमटवार व त्यांच्या कुटुंबीयांवर खोट्यानाट्या केसेस करून प्रचारापासून अलिप्त ठेवण्याचे धोरण आखले जात असुन यावर सखोल चौकशी करत कारवाई चे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिले होते. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीएसआय विजेंद्र नाचण यांना दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात दिंद्रुड पोलीस स्टेशनला शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी केली होती या बाबींचा राग मनात धरून पीएसआय विठ्ठल शिंदे यांनी मंगळवार दिनांक 5 रोजी दिलीप कोमटवार यांचा मुलगा अमित कोमटवार याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा दिंद्रुड पोलीस स्टेशन समोर अमरण उपोषण करण्याची व ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची गावकर्यांनी निवेदनात लेखी स्वरूपात माहिती दिली आहे पीएसआय शिंदे हे काही लोकांसोबत राजकीय हितसंबंध जोपासत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांना निवेदन कर्त्यांनी दिली आहे.      

दिंद्रुडमध्ये राजकीय द्वेषातून ज हाताशी धरून जुने वाद तसेच तेढ निर्माण करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे आणि लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची सुपारी घेण्याचे काम पीएसआय शिंदे करत आहे, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

 - राम उबाळे, दिंद्रुड ग्रामस्थ

खोटे पुरावे तयार करून गावातील लोकांना हाताशी धरून पिएसआय शिंदेंनी चालवलेली हुकूमशाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ बंद करावी नसता आम्ही गावकरी मतदानावर बहिष्कार टाकून पोलीस ठाणे येथे आमरण उपोषणास बसु. 

- गावकरी दिंद्रुड

टिप्पण्या