सेलू ( )नगर परिषद सेलूच्या वतीने प्रजासत्ताक नगर परिषद सेलू वतीने दिनानिमित्ताने बँडमिंटन क्रीडा स्पर्धाचे आयोजन शहरातील शाळा , महाविद्यालयातील शिक्षक, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, इंजिनिअर बँक कर्मचारी, शासकीय कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी, नूतन विद्यालय क्रीडांगण वर दि. 26 व 27 जानेवारी रोजी होणार अशी माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावाचे पालन करुन बँडमिंटन क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना पासून निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी शहरातील कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या क्रीडा स्पर्धा चा अनोखा उपक्रम घेण्यात येत आहेत.
बँडमिंटन क्रीडा स्पर्धा असोसिएशनच्या नियमानुसार पुरुषच्या ( दुहेरी गटात) होतील. प्रथम बक्षीस : ५००१/- व चषक, व्दितीय बक्षीस: ३००१/- व चषक, तृतीय बक्षीस: २००१/- व चषक, चौथे बक्षीस:- १००१/- व चषक,
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या कार्यालयातील प्रमुख च्या स्वाक्षरीने खेळाडूंचे संपूर्ण नाव व मोबाईल नंबर व पदास क्रीडा स्पर्धा सहसंयोजक गणेश माळवे (9423324907) नूतन विद्यालय क्रीडा शिक्षक यांच्या कडे दि. 25 जानेवारी पर्यंत पाठवावी.
अधिक माहिती स्तव क्रीडा स्पर्धा संयोजक गिरीष लोडाया ( ८४२४८८५५९३) सहसंयोजक प्रा. नागेश कान्हेकर , डी.डी.सोन्नेकर, सतिश नावाडे, यांच्या शी संपर्क साधावा.
सेलू शहरातील विविध वर्गातील खेळाडू सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, क्रीडा व शिक्षण, सांस्कृतिक सभापती नाहीद तबस्सुम अजिम कादरी, सार्वजनिक बांधकाम सभापती गौतम धापसे, पाणी पुरवठा सभापती अन्सारी अ.वहीद, महिला व बालकल्याण सभापती सौ.शोभा कोरडे कांचन यांनी केले आहे.

COMMENTS