धर्माबाद (अहमद लड्डा) १९०० व्या शतकातील दलित समाजासाठी कार्य करणाऱ्या ,स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिदेवता आणि पहिल्या स्त्री शिक्षिका तात्कालीन समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला सामाजिक महत्व मिळावे यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लुंबिनीया बुद्ध विहार हर्ष नगर धर्माबाद येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जी.पी.मिसाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सा.ना.भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष देवके सदानंद,मा.तालुका अध्यक्ष शिध्दार्थ वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी जी.के.वाघमारे,पोष्ट आफीस कर्मचारी चंद्रमणी नरवाडे, गंगाधर धडेकर,सि.एन.वाघमारे,चेतन घाटे, अविनाश धडेकर,रोहित धडेकर, रामराव सोनटक्के यांच्या सह अनेक बौद्ध उपासक उपासिका बालकांचा मोठा सहभाग होता.

COMMENTS