जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
बळसोंड भागात गेल्या अनेक वर्षापासून नाली, रस्ते, पाणी, विज सारखे मुलभुत समस्या आहेत. बळसोंड गाव हे शहराला लागुनच असल्याने बळसोंड मधे अनेक उपनगराचा समावेश आहे. अंतुलेनगर व प्रवीण नगर मध्ये मागील पाच वर्षांपासून नालीतले पाणी रस्त्यावर येऊन गटाराचे स्वरूप निर्माण झाले होते ज्यामुळे प्रविणनगर, अंतुले नगर मधील नागरीकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता. दुर्गंधी मुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी सतत पाच वर्षे ग्रामपंचायत ला नाली करण्यासाठी सांगितले परंतु सरपंच व ग्रामसेवकाने दुर्लक्ष केले अखेर सामाजिक कार्यकर्ते पप्पु चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने नालीकरून पाईप टाकुन पाणी काढून दिले. व मुरूम टाकुन रस्त्याची दुरूस्ती केली. यावेळी नागरीकांनी पप्पु चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. पप्पु चव्हाण यांनी या आगोदर ही बळसोंड भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी आंदोलने केली. तसेच बळसोंड भागातील सर्व नगरामधील कचरा उचलण्यासाठी स्वखर्चाने घंटागाडी सुरू केली आहे. सर्व परिसरात दहा हजार झाडांचे वाटप करुन निसर्ग प्रेमाचा संदेश दिला आहे. तसेच लाँकडाऊन काळात नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते पप्पुभाऊ चव्हाण यांच्या सामाजिक कार्याला ग्लोबल मराठवाडा चा सलाम


COMMENTS