नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील जि.प. प्रशालेत कार्य करणाऱ्या श्रीमती रतन अंबादास कराड यांची सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .
श्रीमती कराड यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाज पुरोगामी बनावा , निरोगी राहावा , सतत कृतिशील बनावा , शैक्षणिक क्षेत्रात उच्च गुणवत्ता युक्त व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न केला आहे व सतत करत आहेत .
श्रीमती कराड मॅडम या केवळ शैक्षणिक क्षेत्रात च काम करतात असे नाही तर ज्ञानदानाबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेणे , ग्रामसेवा करणे , तंटामुक्ती संदर्भात समुपदेशन करणे . तसेच कोरोना प्रतिबंधासाठी सातत्याने प्रयत्न करणे , हतबल , दुर्बल लोकांना आर्थिक मानसिक आधार देणे , इत्यादी बहुविध प्रकारची कार्य करून समाजसेवा करतात .
तसेच त्या साहित्य, कला , क्रीडा , ग्रंथालय इत्यादी क्षेत्रातही मोलाच कार्य केले आहे . त्या कवयित्री म्हणुनही प्रसिद्ध आहेत . त्यांच्या कविता व इतर लेख ही प्रसिद्ध झाले आहेत .
त्यांच्या या सुजाण , कर्तव्यशील ,जिद्द , चिकाटी , प्रामाणिकपणा , परिश्रमावरची निष्ठा , प्रतिकुलतेतून मार्ग काढायची धडपड , हातोटी , उदारता ,औदार्य , दातृत्त्व , कर्तव्यपरायनता , तत्परता इत्यादी गुणांमुळे त्यांना आतापर्यंत अनेक क्षेत्रातील राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानपत्र , प्रशस्तीपत्र व पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
त्यात जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार , राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षक पुरस्कार , सावित्रीबाई राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्कार , राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार , राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न सरस्वती सन्मान पुरस्कार , ग्लोबल टीचर रोल मॉडल पुरस्कार 2020 , आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार , आंतरराष्ट्रीय कोविड योद्धा पुरस्कार , आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार , तसेच राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
दि.१६ -12-2020 रोजी मौलाना आझाद सेंटर मध्ये आयोजित केलेला भव्य पुस्तक प्रकाशन तथा विविध राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी मा. संदीप दा. त्रिभुवन उद्घाटक : नरोद्दीन मोल्लाजी , सुमित राठोड , अंकुश त्रिभुवन , दामोदर त्रिभुवन , संजय काळे , सुमनबाई त्रिभुवन अश्या अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पातळीवरील क्रां. ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका व साहित्य क्षेत्रातील ' कवितारत्न ' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . हा सोहळा शब्दगंध समूह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबाद यांनी आयोजित केला होता . यात विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते . या सोहळ्यात श्रीमती रतन अंबादास कराड यांच्या एकूण कार्याचा यशोचित सन्मान करण्यात आला . त्यांच्या या उज्ज्वल व नेत्रदीपक यशाचं समाजातील सर्वच स्तरातून कौतूक व अभिनंदन करण्यात येत आहे .

COMMENTS