कॉंग्रेस कमिटी अनु .जाती जमाती विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत - दत्ता कांबळे


माजलगाव/प्रतिनिधी

            अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांना मेरीटनुसार खुल्या प्रवर्गातूनही नियुक्ती मिळविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला.या निर्णयाचे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती जमाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर स्वागत केले आहे . यापूर्वी भाजप सरकारने अनु .जाती अनु .जमाती च्या उमेदवारांना मेरीट असूनही खुल्या प्रवर्गातून निवड नाकारली होती. 

त्याच्यामुळे आत्ता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सरकारी नौकऱ्यामध्ये खुल्या प्रवर्गातील रिक्त जागा सर्वांसाठीच उपलब्ध आहेत .खुला प्रवर्ग हा ' कोटा ' नाही .इतर मागास प्रवर्ग , अनुसूचित जाती -जमाती यांसारख्या राखीव कोट्यामधील उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांवर नियुक्ती केली जाऊ शकते , असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे .

या निकालामुळे अनुसूचित जाती -जमाती मधील युवक युवतीच्या नौकरी विषयक अशा अजून पल्लवीत होऊन , अनुसूचित जाती -जमातीमधील उमेदवारांना त्यांच्या हिताचा निर्णय असल्या कारणाने मोठा दिलासा मिळाला आहे .याच्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत ,अनुसूचित जाती -जमाती मधील उमेदवारांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा गुणवत्तेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कॉंग्रेसचे अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी केले आहे .

टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
कलाविश्व आणि त्याचे महान नायक: जगप्रसिद्ध चित्रकार- प्रा.राजेश सरोदे.
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज