केज दि २९(प्रतिनिधी)
तालुक्यातील बनसारोळा येथील रहिवाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक, व्यख्याते,समाजप्रबोधन कार,सामाजिक कार्यकर्ते अविनाश धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त बनसारोळा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ गोरे यांच्या नियोजनातून अंबाजोगाई येथील रक्तपेढी अधिकारी यांनी परिश्रम घेतले.या सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी एकूण ४४रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. मित्रपरिवार
साईनाथ जोगदंड, तुकाराम सुवर्णकार, नानाभाऊ धायगुडे, बनेश्र्वर धायगुडे,तेजस धायगुडे,अक्षय धायगुडे, मुरारबाजी धायगुडे,गणेश शिंदे,अनिकेत फस्के, भरत माने ,उद्योजक राहुल गोरे,आदींनी परिश्रम घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक, व्यख्याते,समाजप्रबोधन कार,सामाजिक कार्यकर्ते अविनाश धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमात घेण्यात आला

COMMENTS