नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने समाज संघटनेसाठी नांदेड जिल्हा युवती संघटनेची स्थापना करून संपदा राजेश कुलकर्णी हिची निवड समाज संघटनेसाठी निश्चित फलदायी ठरनारी आहे . असे प्रतिपादन व्ही .पी .के उद्योग समूहाचे प्रमूख तथा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी व्यक्त केली .
व्ही .पी .के . उद्योग समूहाच्या वतीने , कु . संपदा राजेश कुलकर्णी हिची अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ नांदेड जिल्हयाच्या युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्ल तीचा व सुप्रिया सुभाष अंनतवार हिची बी .ए .एम .एस . साठी निवड झाल्याबद्ल कवळे गुरुजी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला
या वेळी मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले की , ब्राम्हण समाज हा मेहणती आणि कस्टी असतो , त्यांच्याकडे दूरदृष्टी असते सामाजिक .राजकीय , आणि अध्यात्मीक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांची चळ्वळ वाखण्याजोगी असते , परंतू हे जरी सत्य असले तरी आज त्या समाजा पुढेही आज अनेक प्रश्न उभे आहेत .समाज संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न निश्चित सुटतील त्यासाठी युवती आघाडी पुढाकार घेईल . तसेच घरच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सुप्रिया सुभाष अनंत वार हिने आपल्या अथक प्रयत्नाने यशाचे शिखर गाठून आई वडीलाचे स्वपन पूर्ण करीत बी.ए .एम .एस या उच्च शिक्षणासाठी पात्र ठरली ही अभिनंदनिय बाब आहे . आनंदराव पाटील भायेगावकर, प्रल्हाद हिवराळे, अण्णा पाटिल इळेगावकर, मधुकर पाटिल रहाटीकर, सुभाषराव अंनतवार, किशोर गव्हाणे, राजेश कुलकर्णी,सोनकाबंळे गुरूजी आधी उपस्थित होते

COMMENTS