नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
अविनाश रामराव लखमोड हा विद्यार्थी इंजिनिअरींग प्रवेशासाठी एम.एच.टि.सीईटी या पात्रता परिक्षेत उत्तीर्ण झालेला आहे. तसेच तेजस माधव लकमोड हा विद्यार्थी नीट या परिक्षेत उत्तीर्ण झालेला आहे.अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यांनी दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी अविनाश व तेजस या दोघांचा वैधतेचा प्रस्ताव अवैध ठरविला होता. ज्यास दोन्ही विध्यार्थ्यानी अॅड. चंद्रकांत थोरात यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यात दि. 9 डिसेंबर रोजी मा. उच्च न्यायालय यांनी सदरील प्रकरणातील समितीचा दि.9 नोव्हेंबर 2020 रोजीचा आदेश रद्द करुन समितीस आदेशीत केले आहे की दोन्ही याचिकाकर्ता यांना मन्नेरवारलू या अनुसूचित जमातीचे वैद्यता प्रमाणपत्र निर्गमित करावे.यावेळी
अॅड चंद्रकांत थोरात यांना अॅड ओम तोटावाड यांनी सहकार्य केले.तसेच दि. 8 डिसेंबर 2020 रोजी मा. उच्च न्यायालय यांचा निर्णय विकास अंकुष कोळी या विद्यार्थ्यास कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्याचे समितीस आदेश दिले. विकास अंकुश कोळी हा विद्यार्थी ज्याने बी.एससी. अॅग्री चे शिक्षण पूर्ण झालेले होते मात्र, वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने त्याचे अंतिम वर्षाचे मार्कमेमो व पदविका निर्गमित केली नव्हती.
मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशामुळे सदरील विद्द्यार्थ्याचा बी.एस्सी. अॅग्री ची पदविका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. विकास अंकुष कोळी या विध्यार्थ्यासाठी अॅड चंद्रकांत थोरात यांनी बाजु मांडली व त्यांना अॅड ओम तोटावाड यांनी सहकार्य केले.

COMMENTS