पिंपरी (दि. 22 डिसेंबर 2020) शिवसेना शाखा दिघी आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान व यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 25 डिसेंबर) दिघी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, माजी आमदार विलास लांडे, माथाडी मंडळ सल्लागार समिती सदस्य व कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, आयोजक संतोष तानाजी वाळके आदी उपस्थिती राहणार आहेत. दिघी येथील ग्लोबल हॉस्पिटल पाठीमागे, विठ्ठल मंदिराजवळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत हे शिबीर होणार आहे. यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे डिजिटल व रेड प्लस रक्तपेढीचे सहकार्य आहे. दिघी, भोसरी परिसरातील इच्छुकांनी रक्तदान कार्यात सहभागी व्हावे. सहभागी रक्तदात्यास हेल्मेट, पाण्याचा जार, हेडफोन भेट या पैकी एक वस्तू भेट देण्यात येईल. अशी माहिती शिबिराचे आयोजक दिघी शिवसेना विभागप्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी दिली आहे.
---------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : संतोष तानाजी वाळके --- 9604557678
Regard,
Sanket Media Solutions,
TULSHIDAS SHINDE
Shop No. 17, Sukhwani Chambers, Opp. Thyssen Krup Company,
Pimpri Station Road, Pimpri, Pune 411018
Contact no.-9822491684, 9552530271.

COMMENTS