रमेश रमेश इतापे/केज
:-संजय गांधी निराधार योजनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बालासाहेब बोराडे यांचा साळेगावच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुका स्तरीय अशासकीय समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बालासाहेब बोराडे यांची निवड झाली आहे. त्या निमित्त साळेगावकर यांच्या वतीने कमलाकर राऊत, पत्रकार गौतम बचुटे व अक्षय वरपे यांनी बालासाहेब बोराडे यांच्या गोटेगाव येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी बोराडे यांनी शासकीय योजनेपासून कुणीही वंचित राहू नये याची दक्षता घेऊन आणि निराधारांची फसवणूक करणाऱ्या दलालांची गय केली जाणार नाही असे सांगितले. तसेच हे पद म्हणजे गोरगरिबांची सेवा करण्याची संधी असून ना. धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपसभापती बजरंग सोनवणे यांनी काम करण्यासाठी दिलेल्या संधी बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS