*आष्टी(दादासाहेब बन)
दिनांक 12/12/2020 रोजी माऊली सामाजिक सेवाभावी संस्था संचलित नवजीवन बालगृहामध्ये आष्टी तालुक्यातील कडा येथील सुप्रसिध्द डॉ.सचिन टेकाडे व डॉ.सौ.मंजुश्री टेकाडे मॅडम यांची कन्या कु. आर्वी हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.*
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेजर विकास म्हस्के तालुक्यात माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नव्याने सुरू केलेल्या भटके विमुक्त, आदिवासी, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार आदिवासी वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन बालगृहाविषयी सविस्तर माहिती दिली व कु.आर्वी ला बाल गृहातर्फे शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.सचिन टेकाडे सरांनी व डॉ.सौ.मंजुश्री टेकाडे मॅडम यांनी आर्वी च्या वाढदिवसाचा इतरत्र अनावश्यक खर्च न करता बालगृहातील गरीब, अनाथ, निराधार, दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे किराणा किट चे वाटप केले.तसेच डॉ. सचिन टेकाडे सरांनी बोलताना सांगितले की आम्ही वेळोवेळी बाल गृहा साठी मदत करून सहकार्य करू असे आश्वासन दिले.
संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती. तेजस्विनी मासाळकर यांनी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी सचिव संतोष गर्जे सर,संचालक बापूसाहेब गायकवाड,विष्णुपंत जाधव,स्वाती मासाळकर, निखिल म्हस्के, इत्यादी,उपस्थित होते.सर्वांनी कु. आर्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS