नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव शहरासह तालुक्यातील कितीतरी घरकुल लाभार्थी आपले घरे बांधकामासाठी रेती साठी अर्ज करूनही त्यांना रेतीच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, परंतु सर्रासपणे रेतीची चोरी होतांना अजूनही घरकुल लाभार्थ्यांना रितीच मिळेना हे सर्व प्रकार पाहता महसूल प्रशासनाचा अजब कारभार घरकुल लाभार्थ्यांना दिसतो आहे.
रेतीचा प्रचंड भाव वाढवून रेती माफियांनी आपले चांगभले करून घेतले आहे पण गरीब घरकुल लाभार्थ्यांना एवढे जास्तीचे पैसे परवडणारे नसल्याने त्यांनी शासनाच्या जीआर प्रमाणे रेती साठी अर्ज करूनही त्यांना आजवर तरी रेतीच मिळाली नाही. म्हणून रेतीसाठी पंचायत समिती व तहसील कार्यालयाला घरकुल लाभार्थी चकरा मारूनही त्यांच्या पदरात रेतीचा कणही पडला नाही. उलट महसूल प्रशासनाने त्यांना रेतीच उपलब्ध नसल्याचे सांगतात मग असे असेल तर आज कित्येक दिवसापासून सर्रासपणे रेतीची चोरी होत असतांना महसूल प्रशासन व रेती माफिया चे चांगभलं होत आहे, परंतु गरीब घरकुल लाभार्थ्यांचे काय असा सवाल लाभार्थी करीत आहेत.आपण पूर्णपणे घर बांधून नव्या घरात प्रवेश करणार की नाही असे स्वप्न घरकुल लाभार्थी पाहतात. तेव्हा वरिष्ठांनी या रेती प्रकरणांमध्ये लक्ष घालने गरजेचे आहे आणि गरीब होतकरू घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांचे घरे पूर्णपणे बांधकाम होईल व आपलेही कर्तव्य पार पडेल पण जाणून बुजून गोरगरिबांना रेतीपासून दूर ठेवण्यास प्रशासन विरोधी घरकुल लाभार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात राहतील असे मात्र सध्या प्रस्थितीवरून जाणवते आहे.

COMMENTS