मुक्त चिंतन बृहन्मुंबई शहरात सेवाभावी जनसेवक दुर्मिळ झाले आहे!! लेखक-दत्ताराम घुगे

दहिसर पूर्व मुंबई उपनगर पश्चिम. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील रुग्ण गंभीर आजारात शस्त्रक्रिया वैद्यकीय उपचारासाठी मुंब...


दहिसर पूर्व मुंबई उपनगर पश्चिम.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील रुग्ण गंभीर आजारात शस्त्रक्रिया वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत नायर रुग्णालयात दाखल झाला होता.काळजीपोटी त्यांचं चार जणांचे कुटुंब रूग्णांसोबत आल्यामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक बृहन्मुंबई महानगरात रहात नाही.कोणाचा परिचय नाही.मला त्यांची आश्रमशाळा अथवा ट्रस्ट हाॅल, किंवा मुंबईत माधवाश्रमासारख्या जागेत पैसे देऊन गेस्टहाऊससारखी सोय होईल का? असा मु़ंबै जेष्ठ नागरिक मित्राने अपेक्षा केली.पण सर्व परिचितांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन नकार घंटा वाजविली.माझ्याकडून आता हे काम झाले नाही जरा खंत वाटली.

गेल्या बारा वर्षांनंतर सेवाभावी कार्यकर्त्यांचीं दुर्मिळता दिसू लागली आहे.माझ्या मुंबई शहरातील चाळीस वर्षे अगदी बालवयात परोपकारी वृत्तीने शेजारधर्म जपत चाळीसाठी झटणं आणि सर्वांना नव्या घरकुलात स्वमालकीच्या सदनिकेत हक्कासाठी भाडेकरुंना न्याय मिळवून दिला.परिसरातील जनतेच्या कामासाठी सन १९७२पासून सन २०१५पर्यंत आमदार नामदार आणि मंत्रालय, बृहन्मुंबई महानगरपालिकेत, म्हाडाच्या कार्यालयात तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात, रूग्णालयात रात्रंदिवस पायपीट केली.जनसेवक या नात्याने दिवस रात्र सेवाभावी कार्यामध्ये वाहून गेले तर तीस वर्षे ताडदेव व्यायाम शाळा रूसी मेहता हाॅलमधील लाकडी बाकड्यावर फाटक्या अंथरूण पांघरूण घेऊन जनहितार्थ अनेक वर्षे घालवली.ताडदेव महर्षी दादासाहेब तथा ज.गो.विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय क्रीडा सेवा मंडळ उभे करून सरकार मान्य नोंदणीकृत करून चाळीस वर्षे सामाजिक बांधिलकीने स्तुत्य उपक्रमातून संस्था चांगली चालविली.आमच्या मुंबई निवासी स्थलात़ंर दहिसर पूर्व उपनगरातील सिमेवर गेल्यामुळे आमचे काही कार्यकर्ते देवाघरी गेले तर आजही मुंबई शहरात आमचे अध्यक्ष, सदस्य घरातच बसून आहे.संस्थाकार्यात ते पुढाकार घेत नाही.आमच्या या सेवाभावी संस्था विजय क्रीडा सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेकांना चांगल्या नोकऱ्या, उद्योग धंदे आणि सरकारी लाभार्थी सल्लागार शासकीय समित्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली होती.आता ते साठ-पन्नास वयोगटातील पदाधिकारी, सदस्य दक्षिण मुंबई,मध्यमुंबै, विभागात आजही रहात असून ती मंडळी याकडे ढुंकूनही पाहत नाही.यांचे दुःख होते.

मी माझी नौकरी सांभाळून संस्था जीवापाड जपली आहे.

माझा मूळ पिंड जनसंपर्क प्रचार प्रसिद्धी क्षेत्र वृत्तपत्र लेखक, मुक्त पत्रकार या   

नात्याने विनामूल्य वृत्त प्रसिद्ध कार्यरत आहेत.

बृहन्मुंबई वृत्तपत्र, दूरदर्शन आकाशवाणी आणि खाजगी प्रसारमाध्यमांची यादी अनेक वेळा दहिसर ते चर्चगेट रेल्वे गर्दीच्या प्रवासातून आणल्या नंतर अनेकांनी मुंबई मराठी पत्रकार संघाची प्रसिद्धी माध्यमांच्या यादी, पत्रकार कोष परत देण्याची बोली, करून परत केलेल्या नाही.आम्ही सगदेवसाहेबांची मिडिया इलेक्ट्रॉनिक प्रि़्न्ट, मिडिया वृत्तसंस्था,व् शासकीय निमशासकीय कार्यालये डाटा पुस्तके आदरणीय श्री शेडगेसाहेबांच्या व श्री भाटकर साहेब कृपेने अनेक वर्षे विनामूल्य सर्वत्र वितरित करण्यात आलेल्या होत्या.आताच्या कोवीड-कोरोणा काळात दोघांनी यादी पळवल्या तर नोव्हेंबर महिन्यात ग्रामसाहित्यिक सौ.अलकाताई विकास सानप माझ्या भगिनीने ग्रॅंट रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आझाद मैदान मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आपल्या स्कुटरवरुन यादी विकत घेऊन ते ताबडतोब कुरिअर ने आपली पदरमोड करून दहिसर पूर्व निवासस्थानी पाठवून माझे वृत्तपत्रातील बातम्या लेख आणि छायाचित्रे पाठविण्यासाठी खूप मदत केली.पण ती यादी माझ्या बालपणीच्या आजच्या दिवसात संपर्क असलेल्या मित्रांकडून मला अलका ताई विकास सानप यांनी दिलेली मुंबई मराठी पत्रकार संघाची प्रसिद्धी माध्यमांच्या यादी परत करण्याचा विसर पडला आहे.एक दोन भेटीगाठी झालेल्या असताना यादी परत नाही,साधी नव्या वर्षाची डायरी देण्याचे

औचित्य नाही.नवी दिल्ली वास्तव्याला असलेल्या जेष्ठ मित्राला मुंबईतून या वर्षी दिवाळी अंक माझ्यावतीने नवी दिल्ली येथे पाठविण्यात असमर्थता दर्शविली.पण त्या महोदयांना आपल्या ही चांगली नोकरी आणि उपनिर्देशक प्रबंधक पदी बढती,नौकरीत खास वाहनव्यवस्था,चार आकडी वेतन,भत्ते, सुसज्ज ऐटदार दालन (कॅबीन) आणि डिलक्स सुखसोयी उपलब्ध करून देणारी देवमाणसं विसरतो, यावर्षी दिवाळी अंक भेट दिली नाही तर माणूसकी हरविलेल्या आताच्या या माणसाकडे पाहून मन अस्वस्थ होते.आता विश्र्वासानं जनहितार्थ कामं जवळच्या लोकांना सांगायला मन तयार होत नाही.माझ्या अलका ताई विकास सानप यांनी"सुमन"एका आदर्श शिक्षिकेच्या जीवनावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथ पुस्तकाला आदरणीय पद्मश्री डॉ तात्याराव लहाने साहेबांच्या प्रस्तावना मिळण्याकरिता माझा बालमित्र आता खूप मोठा झाला."राजा"साहेबांच्या नकारामुळे मी अवाक झालो.वयवर्षे जेष्ठ नागरिक या भावनेने दत्ताराम पुंजाजी घुगे यांना आता बृहन्मुंबई शहरात आपल्या चप्पल झिजवून पायपीट करून धावपळीत गत्यंतर नाही.खरच मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही.आता भरोसा कोणावर राहिला नाही.

माणुसकीचा"विश्र्वास"

इतिहासातील पाणिपतच्या युध्दात अजरामर झालेला आहे.

खरंच मुंबई शहरात सेवाभावी व्यक्तीमत्व दुर्मिळ झालेले आहे.

कृपया या वर आपलं भाष्य, सुसंवाद व्हाटस अप फेसबुक अपेक्षित आहे.मी साद घातली आहे आता प्रतिसाद हवाय.

आपला नम्र

दत्ताराम पुंजाजी घुगे

जेष्ठ नागरिक

व्हाटस् अप नंबर

9821793708

Mobile number

8169747724

Email:

ghuge.dattaram@gmail.com

पत्ता:-405ए, शिवम् गृहसहकारी सोसायटी संत तुकाराम महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज संकूल दहिसर पूर्व मुंबई68

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel