धर्माबाद (अहमद लड्डा)
हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची ओळख होण्याच्या दृष्टीने शालेय स्तरावर परीक्षा घेण्यात आली. शासनाच्या सशर्ती प्रमाणे सर्व परीक्षार्थींची टेंपरेचर तपासणी सेनीटायझर करण्यात आली.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा हि हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथे यशस्वीरित्या पार पडली.
या परीक्षेसाठी बिलोली, उमरी धर्माबाद या तीन तालुक्यात एकूण 253 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. शाळेचे उपमुख्याध्यापक
बेंबरेकर एस.के यांनी (केंद्र संचालक ) म्हणून काम पाहिले तर जिंदमवार एन. एस.यांनी (सह केंद्र संचालक)म्हणून काम केले.
सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पवार जी.एल, गायकवाड आर.जी (पर्यवेक्षक) पुलकंठवार एम.व्हि (पर्यवेक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी धर्माबादचे गटशिक्षण अधिकारी गोडबोले साहेबनी केंद्रास भेट देऊन पाहणी केली व कौतुक केले.
सदर राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे सचिव माननीय विश्वनाथरावजी पाटील बन्नाळीकर संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानीं सहकार्य केले.

COMMENTS