*परत उपासमारीची वेळ येईल का काय ? व्यावसाईकांना पडला प्रश्न.?
केज /प्रतिनिधी.
गेली आठ ते नऊ महीने कोरोना १९ या महामारीने एकच खळबळ माजवली असल्यामुळे , गॅरेज,कापड दुकान, मंडप,न्हावी ,फोटोग्राफर,हॉटेल्स, अशा विविध छोट्या मोठ्या उद्योग व्यावसाईकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.
काही महीने पूर्ण लॉकडाउन असल्यामुळे हातचे काम बंद पडले होते,
परंतु गेली काही दिवसांपासून प्रशासनाने लाॅकडाउन शिथिल करुन उद्योग व्यावसायाना चालू करण्याची परवानगी दिली होती ,
त्यामुळे व्यवसाय क्षेत्रातील नागरिक आनंदित होऊन आपला व्यवसाय करुन उदरनिर्वाह भागवत आहेत.
परंतु शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण कमी होत नसून वाढतच चालले असल्यामुळे केज शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
केज शहरात पुन्हा लाॅकडाउन होईल की काय ? असा मनाला भेडसावणारा प्रश्न नागरिकाना पडला आहे.
पुन्हा लाॅकडाउन झाले तर हातचे काम बंद पडेल व आपली उपासमार होईल अशी चिंता आता नागरिक करत आहेत.
कारण कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सोशल मिडीया ,ईल्क्ट्रोनिक मिडीया व हि लाट म्हणजे पहिल्या पेक्षा तिव्र असल्याचे वरील मिडीयावरून सांगतल्याने सर्वसामान्याच्या व व्यवसाय करणाऱ्यांच्या मनात धसकी भरली आहे.
सोबत फोटो....

COMMENTS