नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण व श्रीधर पाटील चव्हाण यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.नायगांव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण नगराध्यक्ष शरद भालेराव व संपूर्ण नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रथम सत्कार करण्यातआला.युवक काँग्रेस व वसंतराव पाटील चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरास नायगांव,उमरी,धर्माबाद,येथील ३८६ युवकांनी रक्तदान करून आजपर्यंतचा नायगांव येथील रक्तदानाचा उच्यांक गाठला.
उमरी येथे युवक काँग्रेसचे बापूसाहेब कौडगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने उमरी येथील रुग्णालयात गरजू रुग्णाला ब्लॅंकेट व फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले.
उमरी येथून दोनशे मोटरसायकलच्या रॅलीने मतदारसंघचे लक्ष वेधले.धर्माबाद युवक काँग्रेसच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम करून भव्य मोटरसायकल रॅलीवरून रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला नायगांव येथील युवक नवनाथ पाटील जाधव व सुनील पाटील शेलगावे यांच्या वतीने शिक्षण व आरोग्य सभापती संजय अप्पा बेळगे व गटनेते सुधाकर पाटील शिंदे यांच्या हस्ते शासकीय रुग्णाल नायगांव येथे गरजू रुग्णांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.दिवसभर शुभेच्या वर्षाव करण्यासाठी मतदारसंघातील युवकांनी प्रचंड गर्दी केली. शुभेच्छा देण्यासाठी लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्री श्यामसुंदर शिंदे साहेब, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर,रवी पाटील खतगावकर,पप्पु पाटील कोंडेकर,संदीप सोनकांबळे,भालचंद्र पवळे नायगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पडवळ साहेब,नायगावचे तहसीलदार श्री गजानन शिंदे साहेब,शरद भालेराव,नगराध्यक्ष नायगांव,संभाजी पाटील भिरवंडे, प्रल्हाद पाटील इज्जतगावकर ,गोविंदराव पाटील रोशनगवकर,बालाजी पाटील करेंगावकर,बालाजीराव मदेवाड साहेब, मनोहर पवार,बापूसाहेब कोडगावकर,सय्यद रहीमशेठ,डॉ.मधुकर राठोड,बालाजी पाटील कारेगावकर,सामाजिक, शैक्षणिक,क्षेत्रातील अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.भव्य अश्या या रक्तदान शिबिराला श्रीनिवास पाटील चव्हाण,डॉ.विश्वास पाटील चव्हाण,बाबासाहेब पाटील शिंदे,रमेश पाटील शिंदे,उद्धव ढगे सर,नारायण जाधव, सतीश सावकार लोकमनवार यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज पाटील चव्हाण,श्रीकांत पाटील चव्हाण,अजित पाटील चव्हाण,माणिक पाटील चव्हाण,पांडू पाटील चव्हाण,शरद भालेराव,संजय पाटील चव्हाण,शंकर पाटील चव्हाण,बालाजी शिंदे,नवनाथ जाधव,सुनील सेलगावे, जयराज पांढरे,साईनाथ चनावार .गजानन कोंङावार.विश्वनाथ पाटील तामलूरे,विट्टल अप्पा बेळगे,संभाजी सज्जन,मारोती पाटील मोरे,भास्कर ताटे,दत्ता कवटीकवार शरद जोनकले हणमंत कुडलेकर इत्यादी नी परिश्रम घेतले.


COMMENTS