नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) लोकसेवक १) गोविंद गंगाराम पवार, पोहे.कॉ, पोलीस स्टेशन रामतिर्थ रा. गोळेगाव ता. नायगाव, जि. नांदेड...
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
लोकसेवक १) गोविंद गंगाराम पवार, पोहे.कॉ, पोलीस स्टेशन रामतिर्थ रा. गोळेगाव ता. नायगाव, जि. नांदेड वर्ग-३ यांनी २,०००/-रु.ची लाचेची मागणी करून स्विकारली. २) हनमंत रामराव श्रीरामे, पोलीस नाईक वर्ग-३ यांनी फिर्यादीस लाच देण्यास प्रोहत्साहीत करून गोविंद पवार यांना लाच स्विकृतीस मदत केली आहे.
तक्रारदार यांनी दिनांक ३०/११/२०२० रोजी ला.प्र.वि. नांदेड येथे तक्रार दिली की, त्यांचे बियर शॉपिचे दुकान शासनाने निर्धारीत करून दिलेल्या वेळेनंतर चालू राहिल्या नंतर कार्यवाही न करण्या करीता बिटट जमादार पवार व त्यांच्या सोबतचे पोलीस कर्मचारी श्रीरामे पोलीस स्टेशन रामतिर्थ ठिकाणी दिनांक २८/११/२०२० रोजी त्याचे बियर शॉपीला जावून प्रती महीण्याचे १०००/- प्रमाणे मागील चार महिन्याचे ४८००/- रूपयाची मागणी केली, नसला तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे तक्रारदार यांनी भिती पोटी २,०००/-रू त्यांना दिले. त्यांनी उर्वरीत दोन हजार रू. दोन तिन दिवसात पाहिजेत असे बोलले ते मागत असलेला हप्ता म्हणजे लाच असल्याने त्यांच्या विरूद्ध तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीवरून लाच मागणी पडताळणी नंतर सापळा कार्यवाही करण्यात आली. कामरस पल्ली रोड बिजूर येथे असलेल्या आमच्या बिअर शॉपीवर शासनाने ठरवून दिलेल्या वेळे नंतरही चालू राहिल्यास कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करण्या करीता पंच श्री महेश जोपळे यांच्या समक्ष लोकसेवक गोविद गंगाराम पवार, पो.हे.कॉ. यांनी त्यास २०००/-रु. लाचेची मागणी करून [तिरूपती किराणा दुकान बमस्टॅण्ड जवळ रामतीर्थ येथे दिनाक ३०/११/२०२० रोजी १६.५४ वाजता स्विकारली आहे. त्यांना लाच देण्या करीता लोकसवेक हणमंत रामराव श्रीरामे पोलीस नाईक पोलीस स्टेशन रामतिर्थ यांनी तक्रारदार यांना लाच देण्यास प्रोत्साहन देवून पो.हे.कॉ. पवार यांना लाच मागणी व स्विक्रती करीता मदत केलेली आहे. म्हणून पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे गुर.न. १७३ / २०२० कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतियध अधिनियम १९८८ गुन्हा नोंद झालेला आहे.
ही कामगीरी मा. श्रीमती कल्पना बारवकर पोलीस अधिक्षक, ला.प्र.विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्रीमती अर्चना पाटील,अप्पर पो.अधिक्षक ला.प्र.विभाग नांदेड परीक्षेत्र नादेड व श्री विजय डोंगरे पो.उप.अधिक्षक. ला.प्र.विभाग नांदेड यांच्या मार्गदर्शना खाली श्री राजेश पुरी,पोलीस निरीक्षक, पो. हे.कॉ.संतोष शेटे, पो.ना. एकनाथ गंगातिर्थे,दर्शन यादव,चालक पो.ना.गणेश राउत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाच लचपत प्रतिबंधक विभाग नांदेड तर्फे नागरीकांना आहवान करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोण लोकसेवक अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी ईसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया खालील ला.प्र. कार्यालयाशी संपर्क करावा.असे आवाहन राजेश पुरी पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. नांदेड यांच्याद्वारे करण्यात आले.
टोल फि क्र. १०६४ दुरध्वनी क्रमांक ०२४६२ ५२२५३५५१२. dyspacbnanded @gmail.com मो.८९७५७६९९१८

COMMENTS