माजलगाव/भास्कर गिरी
नगराध्यक्ष निवडीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मागील 4 वर्षात 70 प्रकरणात चौकशी अर्ज देणाऱ्या नूतन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी आता चौकशी करणार का या प्रश्नावर होकार दिला असता आ प्रकाश सोळंके यांनी नको ती लफडे मागे लावून घेऊ नको असा सल्ला दिला.यामुळे उपस्थित सर्वजण अवाक झाले.
मागील 4 वर्षात विविध प्रकरणात 70 चौकशी अर्ज शेख मंजूर यांना द्यायला लावणाऱ्या आ प्रकाश सोळंके यांना जर त्या प्रकरणातील चौकशीच करायची नव्हती तर अर्ज का द्यायला लावले असा प्रश्न उपस्थित होत आहे.केवळ सूडबुद्धीचे राजकारण करून सहाल चाऊस यांना काम करु द्यायचे नाही म्हणून आ प्रकाश सोळंके यांनी शेख मंजूर यांच्या मार्फत 70 चौकशी अर्ज दिल्याचे आजच्या त्यांच्या वक्तव्यवरून निष्पन्न होत आहे.मात्र यात चाऊस यांच्या पेक्षा माजलगाव चे नुकसान आ प्रकाश सोळंके यांच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे झाले आहे हे 4000 मताची आघाडी देणाऱ्या शहरातील जनतेला आता कळून चुकेल.
--------------------------------------
न प चा अहवाल आमदारांच्या लेटरपॅड वर
भाजपचच्या नगराध्यक्ष सौ सुमनताई मुंडे यांच्या काळात 31 कोटी रुपयांची कामे मागील 3 महिन्यात मार्गी लागले असल्याचे आ प्रकाश सोळंके यांनी नगराध्यक्ष निवडी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः च्या लेटर पॅड द्वारे वाचून दाखवले.भाजप च्या नगराध्यक्ष च्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आ सोळंके यांची केविलवाणी धडपड उपस्थित पहात होते. विशेष म्हणजे नप च्या 3 महिन्याच्या कामाचा अहवाल आ प्रकाश सोळंके यांच्या लेटर पॅड वर होता.जो की सुमनताई मुंडे यांनी सकाळीच आपल्या लेटर पॅड वर पत्रकारांना दिला होता.
-----------------------------------
नगराध्यक्षच विना मास्कचे
माजलगाव शहराचे नूतन नगराध्यक्ष शेख मंजूर हे नप सभागृह वगळता पत्रकार परिषद, स्वागत समारंभ व प्रभागातील मिरवणुकीत ही विना मास्क फिरत होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष जर विना मास्क फिरत असतील तर जनतेलाच मास्क चे बंधन का अशी उलटसुलट चर्चा शहरात होत होती.
--------------------------------------
बेकायदेशीर काम करू देणार नाही- नगरसेवक रत्नपारखी
माजलगाव न प चे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी जनतेची कामे प्रामाणिक पणे करावी व्यापारी व जनतेस ,लहान लहान समुदायाना कोठेही त्रास झाला तर आम्ही खपवून घेणार नाही कोणतेही बेकायदेशीर काम करू देणार नाही असे भाजप चे गटनेते व न प तील विरोधक विनायक रत्नपारखी यांनी केले.
COMMENTS