*गंगाखेड (प्रतिनिधी)*
समाजातील शेवटचा व्यक्ती जोपर्यंत सर्वसामान्य प्रवाहामध्ये येत नाही तोपर्यंत तन-मन-धनाने अशा गरजू परिवारांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे व मोठ्या मनाने ओंकारनाथ मालपाणी महाराष्ट्र महेश सेवा निधि या सामाजिक संस्थेला मदत करावी असे आवाहन माहेश्वरी सभा महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले .शहरातील समृद्धी फंक्शन हॉल येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी आयोजित समाजातील माहेश्वरी सभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ओंकारनाथ मालपाणी महाराष्ट्र महेश सेवा निधी चे कार्याध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, गंगाखेड चे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, प्रदेश सदस्य नंदकिशोर नोगजा, लक्ष्मीनारायण भुतडा, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम धूत ,जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, सचिव धीरज सोमानी, संघटनमंत्री कैलाश अजमेरा, कोषाध्यक्ष गोकुळदास डाड, माहेश्वरी सभा गंगाखेड चे अध्यक्ष नंदकुमार सोमानी, सचिव विजय बंग, उपाध्यक्ष प्रशांत काबरा, कोषाध्यक्ष गोविंद भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्षांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील उद्योगपती गोपालदास तापडीया व परभणीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम धुत यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक विजयकुमार बंग यांनी केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते विजयकुमार तापडिया, प्रशांत काबरा, डॉ. सुनील तोष्णीवाल, विजय भंडारी या कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिला संघटनेच्या अध्यक्षा प्रेम लता नावंदर ,सचिव सरस्वती बंग, युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद सारडा, सचिव गोपाल तापडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बंग यांनी केले तर आभार गोपाळ मंत्री यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष तापडिया, पंकज भंडारी, राजू मणियार, आनंद धोका, पवन दायमा, डॉ. मनीष बियाणी, गोपाल ओझा, गिरीश मणियार ,जगदीश तापडिया, रामलाल भुतडा, जुगलकिशोर राठी आदींनी सहकार्य केले.
COMMENTS