केज तालुक्यातील केकाणवाडी गुड आवाजाने हादरली.!*

* गावकऱ्यात घबराट, भयभीत झालेल्या लोकांनी घराबाहेर काढला पळ.*   तहसिलचे पथक तात्काळ गावात दाखल.नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. ===========...



  • * गावकऱ्यात घबराट, भयभीत झालेल्या लोकांनी घराबाहेर काढला पळ.*

  •  

  • तहसिलचे पथक तात्काळ गावात दाखल.नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.


========================================


केज ,(प्रतिनिधी)


केज तालुक्यातील केकाणवाडी परीसरात गुड आवाज येत असुन ते भुकंपाचे धक्के असावेत. असे ग्रामस्थांचे म्हणने असुन दोन मोठ्या आवाजाचे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लोक भितीने घराबाहेर पडले . मोठ्या आवाजाने केकाणवाडी व आजुबाजुचा परिसर हादरला असुन घरे घरावरील पत्रे हादरले. भुकंपासारखेच धक्केही जाणवले आहेत.प्रशासनाने याबाबतीत गंभीरपणे दखल घेऊन प्रशासनाची टीम घटनास्थळी पोंहचली होती.


या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील केकाणवाडी येथे दि.१३ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सांयकाळी ५:००वा.गावापासून दोन ते आडीज किलोमीटर अंतारावर गायरान जमीन आहे. त्या ठिकाणापासुन सोनवळा नावाची नदी येत असुन त्या ठिकाणी मोठे आवाज होत असुन त्याच्या आवाजाने गावात हादरे बसले.मोठे दोन व लहान चार असे सहा आवाज झाल्याचे गावचे सरपंच केकाण यांनी सांगितले. या आवाजाने व हाद-याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली .असुन सर्व ग्रामस्थांनी घरातून पळ काढत अक्षरशः भितीने रसत्यावर आले .सरपंच यांनी याबाबतची माहिती तहसीलला कळवल्याने केज तहसीलचे नायब तहसीलदार मा.सचिन देशपांडे यांचे पथक तात्काळ केकाणवाडी येथे दाखल होवुन परिस्थितीचा आढावा घेवुन मा.जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला असुन भुवैज्ञानिक बुधवार रोजी केकाणवाडी गावाला भेट देणार आहेत. गावकऱ्यांच्या म्हण्यानुसार यावर्षी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भुकंपा सारखे आवाज होत असल्याची शक्यता नागरीक व्यक्त करीत आहेत. भुकंपासारख्या आवाजाचे व स्फोटाचे कारण भुवैज्ञानिक आल्यावरच कळणार असल्याचे केज तहसील चे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


 


 


गावचे सरपंच केकाण यांचा फोन येताच आम्ही आमची टिम घेवुन तात्काळ गावात जावून गावकऱ्यांना धिर देत.वरिष्ठांना याबाबत कळवले असुन वरिष्ठ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. न घाबरता सतर्क राहण्याचे सांगितले आहे.


...... मा.सचिन देशपांडे ,नायब तहसिलदार केज.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group