-----------------------------------------------------------
बापू , तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
सत्याचा नाही असत्याचा विजय होतो आता
तुमची ती लोकशाही ठोकशाही बनली आहे आता
बापू , तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
श्रध्देच्या नावाखाली अंधश्रध्देलाच पुजतात आता
मानसांच्या रुपात दानवाचा वावर वाढला आता
बापू , तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
सेवाचाराच्या रुपाने भ्रष्टाचाराचाच विजय होतो आता
किसान करतो कष्ट आणि दलालच होतोय माला-माल आता
बापू , तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
सिमेवर जवान होतो शहिद आणि त्यावर देशात राजकारण होते आता
जनतेच्या नावाखाली नेत्यांचाच विकास होतो आता
बापू , तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
सत्याऐवजी असत्याचेच प्रयोग होतात आता
असत्याला सोडून सत्यालाच शिक्षा होते आता
बापू , तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
तुमचा तो पहिला देश राहिला नाही आता
दिनकर जाधव
७०८३२७२७७७
COMMENTS