'
माजलगाव (प्रतिनिधी )
'कच्चा माठ' या शॉर्ट फिल्म मधून सामाजिक भान ठेवून बाल विवाहा सारखा ज्वलंत विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असे मत प्रख्यात नाटककार डॉ.सतिश साळुंके यांनी पायपीट फिल्म्स् च्या ' कच्चा माठ ' या शॉर्ट फिल्म च्या प्रदर्शन सोहळ्या दरम्यान व्यक्त केले.
माजलगाव शहरात पायपीट फिल्म्स् निर्मित 'कच्चा माठ' या बाल विवाहावर आधारित शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन प्रख्यात नाटककार, इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सतिश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना डॉ.साळुंके म्हणाले की समाजात आज ही खूप मोठ्या प्रमाणात बाल विवाह होतात ही फार दुर्दैवि बाब आहे. त्यामुळे अनेक गंभीर बाबीला सामोरे जावे लागते. अश्या प्रकारचे लघुपट माजलगाव सारख्या ग्रामीण भागात होत आहे ही खूप कौतुकाची गोष्ट असून समाजानेही कौतुक व प्रेरणा देऊन कलाकारांचे मनोबल वाढवले पाहिजे. या लघु चित्रपटातून दिग्दर्शक ॲड.सतिष धुताडमल या तरुण दिग्दर्शकाने समाजिक भान ठेवून खूप कमी वेळेत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पायपीट फिल्म्स् ने अश्या प्रकारचे सामाजिक विषय घेऊन चित्रपटाची निर्मिती नेहमी करावी असे ही डॉ.सतिश साळुंके यांनी खास करून नमूद करत सर्व कलाकारांचे कौतुक केले.
या वेळी' कच्चा माठ ' चे लेखक- दिग्दर्शक-छायाचित्रकार ॲड.सतिष धुताडमल यांनी आम्ही ग्रामीण भागातील कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत राहू असे मत मांडले. व पुढील लघुपटासाठी ते निर्मात्याचा शोधात आहेत.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम येवले , स.पो.नी अविनाश राठोड , पत्रकार कमलेश जाब्रस , रवीकुमार धुताडमल , रंगा अडागळे , ॲड.जे.एस. सजगणे व दत्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच चित्रपटातील कलाकार कु. दिशा वैरागे, ॲड.संतोष कसबे, धम्मा गावडे व भागवत माने. संकलक अमर देवने व अमजद पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विष्णू उगले यांनी मानले' कच्चा माठ ' सामाजिक भान असणारा लघुपट- डॉ.सतिश साळुंके
माजलगाव (प्रतिनिधी )
'कच्चा माठ' या शॉर्ट फिल्म मधून सामाजिक भान ठेवून बाल विवाहा सारखा ज्वलंत विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असे मत प्रख्यात नाटककार डॉ.सतिश साळुंके यांनी पायपीट फिल्म्स् च्या ' कच्चा माठ ' या शॉर्ट फिल्म च्या प्रदर्शन सोहळ्या दरम्यान व्यक्त केले.
माजलगाव शहरात पायपीट फिल्म्स् निर्मित 'कच्चा माठ' या बाल विवाहावर आधारित शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन प्रख्यात नाटककार, इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सतिश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना डॉ.साळुंके म्हणाले की समाजात आज ही खूप मोठ्या प्रमाणात बाल विवाह होतात ही फार दुर्दैवि बाब आहे. त्यामुळे अनेक गंभीर बाबीला सामोरे जावे लागते. अश्या प्रकारचे लघुपट माजलगाव सारख्या ग्रामीण भागात होत आहे ही खूप कौतुकाची गोष्ट असून समाजानेही कौतुक व प्रेरणा देऊन कलाकारांचे मनोबल वाढवले पाहिजे. या लघु चित्रपटातून दिग्दर्शक ॲड.सतिष धुताडमल या तरुण दिग्दर्शकाने समाजिक भान ठेवून खूप कमी वेळेत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पायपीट फिल्म्स् ने अश्या प्रकारचे सामाजिक विषय घेऊन चित्रपटाची निर्मिती नेहमी करावी असे ही डॉ.सतिश साळुंके यांनी खास करून नमूद करत सर्व कलाकारांचे कौतुक केले.
या वेळी' कच्चा माठ ' चे लेखक- दिग्दर्शक-छायाचित्रकार ॲड.सतिष धुताडमल यांनी आम्ही ग्रामीण भागातील कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत राहू असे मत मांडले. व पुढील लघुपटासाठी ते निर्मात्याचा शोधात आहेत.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम येवले , स.पो.नी अविनाश राठोड , पत्रकार कमलेश जाब्रस , रवीकुमार धुताडमल , रंगा अडागळे , ॲड.जे.एस. सजगणे व दत्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच चित्रपटातील कलाकार कु. दिशा वैरागे, ॲड.संतोष कसबे, धम्मा गावडे व भागवत माने. संकलक अमर देवने व अमजद पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विष्णू उगले यांनी मानले..
COMMENTS