करखेली येथे ईद-ए- मिलादुन्नबी साजरी


 


 


धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे ईद-ए-मिलादुन्नबी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. येथेही हा कार्यक्रम प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टनसिंग च्या माध्यमातून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संदेशवाहक मोहम्मद पैगंबर च्या गौरवात जामा मशिदीचे इमाम शाहबाज साहेब देगलूरकर यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या जिवन पद्धतींबद्दल सांगितले आणि त्याला अमलात आणण्यास सांगितले. शांतीचे प्रतीक असलेले मोहम्मद मुस्तफा यांच्या शिकवनी बद्दल व त्यांचे विचार ऐकन्यासाठी करखेली येथील लहान मुले, तरूण आणि वृद्धांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता. मोहम्मद पैगंबर बद्दल एकूण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता व येथे शांततेसाठी प्रार्थना केली गेली. यावेळी सदर मुजीबउद्दीन, नायब सदर मोईनोद्दीन, अब्दुल माजिद अब्दुल रहमान, अब्दुल झैद माजीद, खाजा भाई गिरणीवाले, बाबा अब्दुल कादर, अन्वर मेस्त्री, युनूस, इक्बाल खजांची , रफी पटेल आणि मौजन मोहम्मद दादा उपस्थित होते. या कार्यक्रमात फ़ातेह खानी करण्यात आली आणि सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
डॉ. मथुताई सावंत यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्रदान
इमेज
कलाविश्व आणि त्याचे महान नायक: जगप्रसिद्ध चित्रकार- प्रा.राजेश सरोदे.
इमेज
शेतकर्‍यांना सरकार बैंक व्यवस्थापन कडून पुनर्गठना साठी तगादा लाऊन शेतकर्‍यांना कर्ज माफी पासून वंचित ठेवण्याचा कट.
इमेज