*बीजोउत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी कृषी विभागाकडून केली जातेय जनजागृती*

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी मागील वर्षी शेतकऱ्यांवर प्रमाणित केलेले बियाणे उगवले नसल्याने आर्थिक भार सहन करून दुबार पेरणी,तिबार पेरणीचे संकट ओढाव...


सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी


मागील वर्षी शेतकऱ्यांवर प्रमाणित केलेले बियाणे उगवले नसल्याने आर्थिक भार सहन करून दुबार पेरणी,तिबार पेरणीचे संकट ओढावले होते.त्याचबरोबर काही कृषीकेंद्रांवर गुन्हेही दाखल झालेली आहेत.यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात देखील शेतकऱ्यांना सोयाबीन या बियाण्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोनपेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषीअधिकारी गणेश कोरेवाड,सहाय्यक तालुका कृषीअधिकारी समीर वाळके.यांच्या प्रयत्नातून गावपातळीवर घरगुती बियाणे वापरून बीबीएफ यंत्राचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना पुढील वर्षासाठी यावर्षी सोयाबीन काढणी हंगामामध्ये पडलेल्या पावसाने त्रास सहन करावा लागला आहे.या सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचा प्लॉट निवडून यातून भेसळयुक्त असणारी सोयाबीनची झाडे काढत दर्जेदार बीजोउत्पादन करण्यासाठी काढणी हंगामापूर्वी आठदिवस अगोदर बाविस्टिन किंवा बुरशीनाशक अशा औषधीची फवारणी करून सदर बियाणे जतन करून ठेवण्यासाठी आवाहन केले जात आहे.गावपातळीवर एका ग्रामस्तरीय समितीची रचनाही करण्यात आली असून या समितीने जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन करत यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचे आहे.त्याचबरोबर या समितीत तीन प्रगतशील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या ज्ञानाचा फायदाही मार्गदर्शक म्हणून इतर शेतकऱ्यांना होणार असल्याचे कळते.यासाठी कालिदास मस्के,सुनील औताडे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनुक्रमे ५ व ३ एकरवर पेरण्यात आलेल्या सोयाबीन पिकाचा प्रात्यक्षिक म्हणून वापर करण्यात येऊन या वाणाची विक्री शेतकऱ्यांना बियाणे म्हणून करण्यात येणार आहे.



COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group