संत महंत यांच्या दरबारात डॉक्टर सुरेश मुंडे यांचा विठ्ठल रूपी गौरव ....!! केज/ प्रतिनिधी :-
संतांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राने नेहमीच निस्वार्थपणे केलेल्या कार्याची दखल वेळोवेळी घेतली आहे .
आज हनुमान गड सावरगाव येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने ह-भ-प- खाडे महाराज तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी आपल्या कुटुंबासह डॉक्टर सुरेश मुंडे सरांना भेट देण्यास बोलावले . महाराजांच्या शब्दाला मान देत डॉक्टर सुरेश मुंडे सर हनुमान गड येथे पोहोचताच त्यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. डॉक्टर साहेबांना याची कसलीही पूर्वकल्पना नव्हती की आपल्या भव्य दिव्य अशा सत्कार सोहळा होणार आहे. प्रत्यक्ष मात्र सप्त गंध फुलांचा हार यांनी विठ्ठलाला जसे फुलांच्या माळांनी माखले जाते तसे साक्षात विठ्ठलाचे रूप डॉक्टरांना देण्यात आले होते. ह-भ-प-खाडे महाराज डॉक्टरांचा गौरव करताना म्हणाले की जनमानस साक्षात डॉक्टर साहेब देवाला तुमच्यात पाहत आहेत. एखाद्या माणसाच्या जीवनात अपघात झाला तर लोक देवाचं नाव घेतात परंतु मोडलेल्या माणसांचे खरे देव तर तुम्हीच आहात. म्हणूनच गडाच्या भक्तांनी आणि परिसरातील मंडळींची इच्छा होती की एकदातरी डॉक्टर सुरेश मुंडे आणि डॉक्टर सोनाली मुंडे यांचा मोठा गौरव करावा आणि आज ते भाग्य या गडाला लाभलं. गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार आणि गौरव करण्याचं भाग्य सगळ्या भक्तगणांना आणि ह.भ.प. खाडे महाराजांनी भेटल्या बद्दल त्यांनी डॉक्टर सुरेश मुंडे आणि डॉक्टर सोनाली मुंडे यांचे आभार मानले व आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल क्रतज्ञता व्यक्त केली. हा सगळा गौरव सोहळा पार पडल्या वर डॉ सुरेश मुंडे व डॉ सोनाली मुंडे यांचे मन भरून आले होते. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते.
COMMENTS