धर्माबाद (अहमद लड्डा) राहूल गांधी यांना अटक करणार्या
उत्तरप्रदेश येथील योगी सरकारचा धर्माबाद मध्ये तीव्र निषेध करण्यात आला.
योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून धर्माबाद तालुका व शहर कांग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.*
हाथरस ऊत्तरप्रदेश येथे मनीषा वाल्मीकी या दलीत महीलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व पिडीत महीलेच्या कूंटूबिंयाना भैटण्यासाठी कांग्रेसचे नेते राहूल गांधी व प्रियंका गांधी जात असतांना उत्तर प्रदेश पोलीसांनी त्यांना अटक करुन लोकशाहीची हत्या केली.या घटनेचा निषेध करण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार धर्माबाद शहर व तालुका कांग्रेसच्या वतीने पानसरे चौकात योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध करुन यूपी सरकार व नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धर्माबाद कांग्रेसच्या वतीने योगी सरकारच्या विरोधात .
*मा.राहूल गांधी व मा.प्रियंका गांधी* यांच्या अटकेचा तीव्र निषेध व मनीषा वाल्मीकी या दलीत महीलेला न्याय द्यावा व गून्हेगांराना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक निलेश पाटील, नगरसेवक प्रतिनिधी राजु सुरकुटवार, नगरसेवक प्रतिनिधी शंकर बोल्लमवाड, शहराध्यक्ष ताहेर पठाण, नरेंद्र रेड्डी, युवक काँग्रेसचे हणमंत नरवाडे, योगेश जायशेट आणि मारोती माकणे इ.
कांग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते.
COMMENTS