____________________________________________
उमरी- येथील मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा व्यक्तींनी आपल्या माहितीसह प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी केले आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रांतील महिला व पुरुष यांना एकूण दहा पुरस्कार दिले जातात. आजपर्यंत प्रा.रविचंद्र हडसनकर, प्रा.शेषेराव नाईकवाडे, एम.सायल्लू म्हैसकर, डॉ. सिध्दोधन कांबळे, प्रा.दु.म.लोणे, शंकर गच्चे, पत्रकार प्रकाश कांबळे, कांचन वीर, लताताई शिंदे, रेखा पंडित, पुष्पा चौदंते यांच्यासह २४ जण या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठेचे मानले जात आहेत.
सन २०१९-२० या वर्षाकरिता इच्छुकांनी आपल्या नाव, फोटो, पत्यासह आवश्यक माहितीचा बायोडाटा असलेला प्रस्ताव नागोराव डोंगरे, आशिर्वाद निवास, यशवंत काॅलनी, उमरी ता. उमरी जि. नांदेड -४३१८०७ या पत्यावर ३१आॅक्टोंबर पर्यंत पाठवावेत. साहित्यिकांनी आपली २०१९ या वर्षातील प्रकाशित साहित्यकृती दोन प्रतींत पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९४२१७६९८४१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.
COMMENTS