केज ! प्रतिनिधी
*विडा गणाचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटु) ठोंबरे यांनी स्व:ताचे ६० ते ६५ वर्षाचे आई व वडील व दहा वर्षापासून दहीफळ येथून मुंबईला स्थलांतर आसलेले दोन जण रोजगार हमीच्या कामावर दाखवून त्यांच्या नावे केजच्या दी.मध्यवर्ती जिल्हा बँकेत बनावट खाते उघडून खात्यातून रक्कम उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आसल्याने दुसर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांच्याच बुडाखाली अंधार असल्याचे समोर आले आहे.*
केज तालुक्यातील विडा पंचायत समिती गणाचे आदर्श पंचायत समिती सदस्य दत्तात्रय पिंटु ठोंबरे यांनी वक्षलागवड व बांधबंधिस्तीच्या कामावर स्वताचे ६० ते ६५ वर्षाची आई कमल येडू ठोंबरे व वडील येडु कुंडलीक ठोंबरे यांना २५ -४-२० ते २९-४-२० दरम्यान कामावर दाखवून पैसे उचलले आहेत.मात्र स्वत्हा स्कार्पिओ गाडीत फिरूण,दुसर्यांकडे बोट दाखवणार्या रूबाबदार व्यक्तीचे आई-वडील रोजगार हमीच्या कामावर काम करतातच कसे हाच प्रश्ण सध्या निर्माण झाला आहे.परंतू एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी दहीफळ येथून दहा वर्षापासून मुंबईत स्थलांतर असलेले वनोद अर्जुन मोरे व अशा सतिष बाबर यांनी ६-६-२० ते १०-६-२० दरम्यान दहीफळपाटी ते पिराचीवाडी रस्त्यावर रोजगार हमीच्या कामावर दाखवून केजच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बनावट खाते उघडून पैसे उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे सतत विडा गटातील विकास कामावर तक्रारी देऊण अधिकार्यांना वेढीस धरून दुसर्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्यांच्या बुडाखाली अंधार आसल्याचे समोर आले आहे.
COMMENTS