नवीन मोढयाला भेट देऊन केली पाहणी
माजलगाव/भास्कर गिरी
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी नवा मोंढा फुले पिंपळगाव येथे आडत व्यापारी, शेतकरी,हमाल, मापाडी, मुनिम या सर्व बाजार घटकांसाठी आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सुलभ शौचालय जागेचे भूमिपूजन करत कामकाजाला सुरुवात केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अच्युतराव लाटे हे उपस्थित होते.
पूर्वी दिवसापासून या सर्व बाजार घटकांना उघड्यावर शौचास जावे लागत होते ही बाब लक्षात येताच संभाजी शेजुळ यांनी आपल्या कामाची सुरुवातच सुलभ शौचालयाच्या जागेच्या भूमी पूजनाने करण्याचा निर्णय घेतला व भूमिपूजन झाल्या नंतर त्यांनी नवीन मोंढ्यात पायी फिरत सर्व मोंढ्याची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत संचालक अनंतराव सोळंके, पांडुरंग वगरे, प्रभाकरराव होके, सुहासराव सोळंके, आगे ,सचिव एच.एन. सवणे,बंडू ईके,बाळासाहेब पवार यांच्यासह शेतकरी, व्यापारी, हमाल कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS