धर्माबाद ( अहमद लड्डा) धर्माबादच्या लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात रा.से.यो. विभागाच्या वतीने *प्रा.डॉ.मारोती लुटे, रा.से.यो. जिल्हा समन्वयक, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड* यांचे *विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात रा.से.यो.ची भूमिका* या विषयावर कोरोना महामारीच्या संकटकालीन स्थितित सामाजिक सुरक्षिततेचे भान ठेवत *ऑनलाईन व्याख्यान* आयोजित केल्या गेले. या प्रसंगी प्रा.लुटे सरांनी रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांना रा.से.यो. ही विद्यार्थ्यांमध्ये संवाद-कौशल्य, नेतृत्व-कौशल्य यांचा विकास करत, त्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक माध्यम बनून त्यांच्यात समाजसेवा करण्याचे बीज रुजवते व स्वतः सोबत समाजाचा विकास करण्यास प्रेरित करते. याचे सोदाहरण विश्लेषणात्मक व्याख्यान दिले. शुक्रवारी झालेल्या या व्याख्यानाचे *अध्यक्षीय वक्तव्य* महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य *डॉ.श्रीराम गव्हाणे* यांनी दिले, तर कार्यक्रमाच्या *प्रास्ताविकात* रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी *प्रा.डॉ.प्रतिभा जी. येरेकार* यांनी रा.से.यो.ची.स्थापना व उद्दिष्ट स्पष्ट करत या दिवसाचे महत्व प्रतिपादित केले. या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्र-संचालन क.म.कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी श्रीगिरे व आभार स्वयंसेवक ओंकार मठपती यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ रा.से.यो.च्या अनेक स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवून घेतला.
COMMENTS