माजलगाव / प्रतिनिधी
रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काल दि.२० मंगळवार रोजी गेवराई येथे रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुनील ठोसर पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये प्रदेश कार्यकारणी व बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी बीड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून पृथ्वीराज निर्मळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सुनील ठोसर पाटील यांची रयत शेतकरी संघटना प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली असून. नईम अत्तार यांची बीड जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास कोतवाल, दौंड तालुका अध्यक्ष तात्यासाहेब टिळे, वामनराव टिळे, औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस राजूभाई मदारी सर्पमित्र, राम नवले, राजेश्वर मोरे, प्रदीप झोडगे, प्रमोद डोंगरे, सुरेश पिटोरे तसेच बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS