नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार
नायगांव पंचायत समिती व तहसील कार्यालयात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांच्या विविध न्याय हक्काच्या मागणी साठी वेळोवेळी निवेदन देवुनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याने दि.28 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर नायगांव तालुक्यातील दिव्यांग बंधनाच्या न्याय हक्कासाठी सबंध दिव्यांग बांधवांना एकत्र करून एक दिवस लाॅकङाऊन सत्याग्रह उपोषण करण्यात आले होते.पंचायत समितीचे सभापती सौ.प्रभावतीताई कत्ते यांचे प्रतिनिधी विठ्ठलराव कत्ते यांनी पंचायत समितीच्या आधिकारात येणा-या चार मागण्या मान्य करुन या नंतर दिव्यांगाना उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नसल्याचे सांगितले व गटविकास अधिकारी पी.पी.फाजेवाड यांनी ही चौकशी करण्याचे लेखी आश्र्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
नायगांव तालुक्यातील एकुण ८० ग्रामपंचायती पैकी ६७ ग्रामपंचायती मध्ये दिव्यांग लाभधारकांना अनुदान वाटप केले असले तरी बाकीच्या १३ ग्रामपंचायती मध्ये अजूनही 5 % टक्के दिव्यांग बांधवांचा निधी हा वाटप केला जात नाही त्याचबरोबर २३ मागण्या शासन निर्णय असताना सुद्धा निधी वाटप होत नाही शासनाने वेळोवेळी जीआर काढून आदेश करून सुद्धा वेळोवेळी अधिकारी हे अनेक योजने पासुन वंचित राहवे लागत असुन त्यासाठी प्रहार संघटनेतर्फे सबंध नायगांव तालुक्यातील दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी दि.28 सप्टेंबर 2020 पासुन तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर नायगांव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी लाॅकङाऊन सत्याग्रह व उपोषण सुरू करण्यात आले होते सायकांळी. तीन वाजता गटविकास अधिकारी पी पी फाजेवाड व सहायक गटविकास अधिकारी माधव केंद्रे, सभापती सौ प्रभावती कत्ते यांचे प्रतिनिधी विठ्ठलराव पा कत्ते, उपसभापती संजय पाटील शेळगावकर, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी परमेश्वर पा धानोरकर, बाबासाहेब पा हंबर्डे, बालाजी मदेवाड, नामदेव कांबळे यांनी प्रतिनिधी स्वरुपात दिव्यांगाच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहाण्याचे आश्र्वासण दिले त्यामुळे दिव्याग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले लाॅकङाऊन सत्याग्रह उपोषण मागे घेतले .
सदर लाॅकङाऊन सत्याग्रह व उपोषणाला प्रहार दिव्याग क्रांती संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विठ्ठलराव पा मंगनाळे,नायगांव तालुका प्रमुख साईनाथ बोईनवाड व माधव कोसंबे, श्रीराम पा पवार, मारोती मंगरुळे,गोपीनाथ मुंडे आबंटवार, राजेश पा बेळगे, मिलिंद कागडे,चांदु आबंटवार, माधव लालवंडे आणि कार्यकर्ते ,पदाधिकारी व दिव्याग बांधव उपस्थित होते.
COMMENTS