महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. कृष्णदेव गिरी यांच्या मार्गदर्शनखाली लातूर जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकिस संघठनेचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटेश पुरी यांनी बोलताना
देशातील विविध क्षेत्रामध्ये आजपर्यंत दशनाम गोसावी समाजातील अनेक व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे परंतु एवढ्या वर्षांमध्ये शासनाच्या नजरेमध्ये मात्र आपला समाज उपेक्षित राहिला आहे येणाऱ्या काळात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी बैठकिस प्रदेश प्रवक्ते प्रविण गिरी, मराठवाडा महामंत्री राजेद्र गिरी,जिल्हाध्यक्ष विशालजी गिरी,जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद बन ,युवा जिल्हाध्यक्ष पवन गिरी व प्रा. रमेश भारती तसेच जिल्ह्य़ातील कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. यावेळी बैठकिच्या सुरूवातीला
श्रद्धास्थान ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आली यावेळी मोठ्या संखेन संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांना संघठनेच्या ध्येय धोरणाची माहिती देण्यात आली
COMMENTS