सोनपेठ/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून ओबीसीयासारख्या बंजारा,भटक्या-विमुक्त तथा मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नासंदर्भात राज्य विधीमंडळात,विविध बैठकांद्वारे सरकार दरबारी ओबीसींचे नेते माजी खासदार,माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी अनेकदा चर्चा घडवून आणून,मागण्यांचा पाठपुरावा करूनही इतकेच काय तर सरकारचे थेट आश्वासन मिळूनही अद्यापपर्यत या उपेक्षित समाजास न्याय मिळालेला नाही.याकरिता हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व तहसीलसमोर उपेक्षित समाजाच्या वतीने डफडा बजाव आंदोलन पार पडणार आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मारोती पवार यांनी केले आहे.त्यांनी आवाहन पत्रकात असे नमूद केले आहे की,वंचित-उपेक्षित समाजाचे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न जसे की,गोर बंजारा आरक्षण,क्रिमीलेयर अट,बढतीमधील आरक्षण,वसंतराव नाईक तांडा सुधार योजना इ.इ.असे अनेक ज्वलंत आणि तातडीचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत.यासोबतच इतर तातडीच्या प्रलंबित प्रश्नांकडे आजच्या महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गोरबंजारा,भटक्या-विमुक्त तथा ओबीसी समाजातर्फे राज्यभर अनोखे असे"डफडा बजावो आंदोलन"करून आजच्या आघाडी सरकारला आपला हक्क मागणार आहोत.मागील भाजपा सरकारने जाणीवपूर्वक केलेला विश्वासघात आणि आजच्या आघाडी सरकारच्या जलसंपदा विभागाने'जलक्रांतीचे जनक' संदर्भात व कृषी विभागाने'शेतकरी दिन'संबंधी काढलेल्या चुकीच्या व अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या १५ आक्टोंबर २०२०,गुरुवार रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी-एकाच वेळी,दुपारी १२ वाजता माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनानुसार सर्व
तालुका येथे तहसीलदार कार्यालयासमोर व सर्व जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडा वाजवून"डफडा बजावो आंदोलन"करण्यात येणार आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.
COMMENTS