..................................................
नायगांव ( प्रतिनिधी )
..............................
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांची 385 वी जयंती नायगांव शहरात जीवा महाले संघटना शाखा नायगांव च्या वतीने नुकतीच साजरी करण्यात आली.
लाॅकङाऊन काळात जमावबंदीचे आदेश असल्यामुळे घरगुतीच जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता प्राध्यापक लक्ष्मण कोंडावार यांच्या अध्यक्षतेखाली जयंती कार्यक्रम घेण्यात आला तर उद्घाटक म्हणून पत्रकार रामप्रसाद चन्नावार प्रमुख पाहुणे माधव बैलकवाड, संदीप कांबळे, माधव पाटील मोरे देगावकर, यांची उपस्थिती होती. सुरुवातीस जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला सर्वजणांनी पुष्पहार अर्पण केले तर लक्ष्मण कोंडावार सर व माधव पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला तर कोंडावार सर व पत्रकार बैलकवाड यांनी जिवाजी महाले च्या जीवनावर मनोगत आपले मांडले असून यावेळी विश्वंभर गायकवाड सावखेडकर, माधव सज्जन शेळगावकर, अविनाश रहेरकर, अविनाश गायकवाड, शंकर गायकवाड ,जीवा महाले संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर नरसीकर यांनी सर्वांचे आभार मानले आहे.
COMMENTS