माजलगाव/प्रतिनिधी
मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी आंदोलनकांनी बीड जिल्हाचे खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांना घेराव घातला. याप्रसंगी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलकांचे निवेदन स्विकारून मागण्यासंदर्भात आश्वासित केले.
राज्यातील मुस्लिम समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. समाजात शैक्षणिक प्रमाण अत्यल्प असल्याने मुस्लिम समाजाचा विकास होवु शकला नाही. मुस्लिम समाजाच्या आज पावेता केवळ राजकिय फायद्याच्या हेतुने मतदान मिळविण्यापुरता वापर करून सर्वांगिण विकासापासून शासन सोई सवलती पासुन मुस्लिम समाजास अलिप्त ठेवण्यात आले. मुस्लिम समाजाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक, शासकिय नोकरीच्या प्रवाहात आणण्यासाठी 10 टक्के मुस्लिम आरक्षण लागू करावे. ही मागणी मागील अनेक वर्षापासून आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दि.02 आँक्टोबर रोजी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन माजलगाव च्या वतीने खासदार डॉ प्रितमताई मुंडे माजलगाव येथे आले असता. त्यांना घेराव घालून निवेदन सादर करण्यात आले . यावेळी आंदोलकांनी मुस्लिम आरक्षण लागू करण्यासाठी आपण सरकार दरबारी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यानुसार खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून स्वतःही लक्ष घालू अशी ग्वाही माजलगाव मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समितीच्या सर्व उपस्थित सदस्यांना दिली.
COMMENTS