नायगांव (प्रतिनिधी )
महाराष्ट्र मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटनेचे प्रात सरचिटणीस काॅ. एस.वाय. कुलकर्णी यांचे कोरोना आजाराने निधन झाले.समाजवादी नेते कै.बा.न.राजहंस यांच्या तालमित संघर्षमय चळवळीत त्यांचा सहभाग होता.
त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया वन कामगार संघटनां व हिन्द मजदूर संघटनेचे नेते साथी प्रकाश शिंदे, संघटनेचा प्रातं उपाध्यक्ष तुकाराम मोरे, जि.प. कर्मचारी संघटनाचे नेते बाबुराव पुजरवाड, संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी व्यक्त केली
कै.कुलकर्णी यांच्या पार्थिवावर बिड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या निधनाने असंघटीत कामगार,शासकीय, निम शासकीय बरोबरच मस्टर असिस्टंट संघटना चळवळीचे मोठे नुकसान झाले ते कदापी भरून निघणार नसल्याची आदराजंली शिरीष साले, मोरे व विश्वास खतीब यांनी व्यक्त केली.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
COMMENTS