------------------------------------------------
केज ( प्रतिनीधी ) तालुक्यात सध्या मग्रारोहमीयोजनेतील कामात बोगसगीरी करत करोडो रूपयाचा घपळा तालुक्यात उघडापडला असतांनाच लव्हुरी येथील ग्रामपंचायतने केल्याचे उघडकीस आले आहे.या मध्ये शासकिय कर्मचारी व अपंग ,मयत व काल्पनीक मजुर दाखवत १५ लाखाच्यावर रक्कम हडप केल्याची पुराव्यासह तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष कैलास चाळक व कृष्णा जगताप यांनी दाखल केली आहे.
केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत मध्ये बांधबंदिस्थी भाग १,२,३ व शोष खड्डयासह इत्तर कामे न करता शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून कामे न करताच करोडो रूपयाचे बनावट रेकॉर्ड बनवुन रक्कम हडप कली आसल्याचे प्रकार समोर आल्याने चौकशी पथके काम पाहनी करत आहेत लव्हुरी ग्रामपंचायत सरपंच व सरपंच पुत्रासह इतरांनी गेल्या वर्षी अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाऊडेंशन अंतर्गत लोक सहभागातुन बाध बंधीस्ती सह शोष खड्याची कामे मोठ्या प्रमानात केली आहेत.हिच कामे सरपंच व सरपंच पुत्रांनी पंचायत समिती केज च्या अधिकारी व कर्मचारी यांना हताशी धरत कसल्याही प्रकारचे कामे न करताच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने मंजुर करून घेत काम झाल्याचे दाखवत १५ लाखापेक्षा अधिक रक्कमेवर डल्ला मारला आहे.या कामावर दाखवण्यात आलेल्या मजुरांपैकी ११७ मजुर हे शासकिय नौकरीच्या ठिकाणी कार्यरत आसतांनाही कामावर हजर आसल्याचे दाखवले आहे याच बरोबर अंध-अपंग/अंतरजिल्हा स्थलांतरीत विध्यार्थी/ मयतव्यक्ती सह ईतर काल्पनीक नावाची संख्या- ११७ मजुर दाखवली आहेत या सर्वांची मग्रारोहयो अतर्गत जॉब कार्ड बनवली आहेत या साठी कोनता शासकिय रहिवाशी पुरावा दाखवला ? शासना कडुन गाव विकासांच्या कामात सरपंच व सरपंच पुत्रांनी कामे न करताच आज पर्यत यापुर्वी देखील लाखो रू ची बोगस कामे करून रक्कम हडप केली आहेत.या सर्व प्रकरणी स्थळ पाहणी करून ११७ बोगस / मयत काल्पनीक मजुरांची शहानीषा करावी व यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा केज मधुन जी रक्कम हडप केली त्याची चौकशी करून दोषी विरूद्ध व ईतर सर्व दोषी विरूद्ध कायदशीर कारवाई अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष कैलास चाळक व कृष्णा जगताप यांनी तहसिलदार जिल्हाधीकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी बीड यांना लेखी पुराव्यासह निवेदन दिले आहे.
COMMENTS