====================================
मोटारसायकल सह रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरांचा पोबारा
=====================================
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे गुरुवारी मध्यरात्री एकाच वेळी वेगवेगळ्या तीन ठिकाणी चोर्या तर तीन ठिकाणचा चोरीचा प्रयत्न फसला
याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे गुरुवार च्या मध्यरात्री जालिंदर रामराव गलांडे यांच्या राहत्या घरातून पीक कर्जाच्या माध्यमातून मिळालेली व काही रक्कम साठविलेली अशी एकूण 72500 रुपयांची नगदी रोकड तर 4 ग्रॅम सोन्याची अंगठी व 1 ग्रॅम सोन्याचे मनी सर्व मिळुन जवळपास एक लाखाचा ऐवज घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी लंपास केले, तर याच घरासमोरील कृष्णा ज्वेलर्स नामक नामदेव अच्युतराव गलांडे यांच्या मालकीच्या दुकानातून रिपेरींग साठी आलेली चांदीचे दागिने व सोन्याचे मोरणी (नाकातले) दागिने दोन्ही मिळून अंदाजे एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी दुकानातील अलमारी चे व दुकानाचे कुलूप तोडून चोरून नेला. दरम्यान याच रात्री येथील बबन प्रल्हाद गलांडे यांची (MH-12, S-6738) नंबरची हिरो होंडा कंपनीची दुचाकी चोरली. सर्वांची मिळुन जवळपास तीन लाखाची चोरी करुन चोरांनी पोबारा केला. दरम्यान याच रात्री अन्य तीन ठिकाणी चोरांनी कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला परंतु तो फसला. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक एस. एम. काळे, सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पोकॉ. अमोल गायकवाड, पोकॉ. के. एस. गवळी, घटनास्थळी दाखल झाले. व पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.
COMMENTS